Redmi Pad च्या किमती झाल्या कमी; पहा किती रुपयांत खरेदी करता येईल

टाइम्स मराठी | भारतात Redmi या ब्रँडकडून वेगवेगळे Tablet, Laptop, Mobile लॉन्च करण्यात येतात. यासोबतच कंपनीने ऑक्टोबर महिन्यात लॉन्च केलेल्या Redmi Pad या टॅबलेटच्या किंमती वर्षभरानंतर कमी करण्यात आल्या  आहेत. कंपनीने हा टॅबलेट तीन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला होता. यामध्ये 3GB + 64GB स्टोरेज, 4GB + 128GB स्टोरेज, 6GB +128 GB हे स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध होते. रेडमी कंपनीने या टॅबलेटच्या सर्व व्हेरिएंटच्या किमतीत घट केली असून तुम्ही हा टॅबलेट कमी किमतीत खरेदी करू शकता. आज आपण जाणून घेऊया या टॅबलेटच्या नवीन किंमती.

   

 किंमत आणि डिस्काउंट

REDMI PAD या टेबलाच्या 3GB + 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 14,999 होती. परंतु आता या टॅबलेटमध्ये कंपनीने 1000 रुपयांची घट केली आहे. 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली होती. आता या टॅबलेट 3000 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. तर 6GB +128 GB स्टोरेज व्हेरीएंट 19,999 रुपयात लॉन्च करण्यात आला होता मात्र त्यामध्ये सुद्धा कंपनीने 2000 रुपयांची कपात केली आहे.

नवीन किमती

REDMI PAD या टॅबलेटच्या व्हेरियंटमध्ये घट करण्यात आल्यानंतर टॅबलेटच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, 3GB + 64GB स्टोरेज असलेल्या टॅबलेट तुम्ही 13,999 रुपयात खरेदी करू शकतात. 4GB + 128GB स्टोरेज व्हेरीएंट 14,999 रुपयात तुम्हाला मिळेल. 6GB + 128GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट तुम्ही 16,999 रुपयात खरेदी करू शकतात. या टॅबलेटच्या नवीन किमती कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वर लाईव्ह करण्यात आले आहेत.

 स्पेसिफिकेशन

REDMI PAD या टॅबलेट मध्ये 10.61 इंच डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या टॅबलेट मध्ये MEDIATEK HELIO G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये तुम्हाला 8000 MAH बॅटरी मिळते. ही बॅटरी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबलेट च्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 8 MP रियर कॅमेरा आणि सेल्फी साठी 8 MP फ्रंट कॅमेरा मिळतो. कंपनीने या टॅबलेट मध्ये ग्रॅफाइट ग्रे, मिंट ग्रीन, मूनलाईट सिल्वर कलर ऑप्शन उपलब्ध केला आहे.