Redmi चं ग्राहकांना मोठं गिफ्ट; अर्ध्या किमतीत खरेदी करा Smart TV

टाइम्स मराठी । Redmi कंपनीचे स्मार्टफोन तर भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. पण या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलायचं झाल्यास कमीत कमी किमतीमध्ये देखील चांगल्या दर्जाचे स्मार्ट टीव्ही ती उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून आपण रेडमी कडे पाहत असतो. आता तर रेडमीच्या ग्राहकांना स्वस्तात मस्त Smart TV खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Xiaomi च्या 9व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी आपल्या ग्राहकांना हे खास गिफ्ट देणार आहे.
शाओमी च्या ऑफरनुसार तुम्हाला 42 टक्के डिस्काउंट म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही मिळू शकतो. खास करून ज्या ग्राहकांचा बजेट कमी आहे अशा ग्राहकांसाठी हि नक्कीच खुशखबर आहे. चला आज आपण जाणून घेऊया कोणत्या स्मार्ट टीव्ही वर किती टक्के डिस्काउंट मिळतोय.

   

१) Redmi Smart Fire TV-

या स्मार्ट टीव्हीची किंमत 24,999 रुपये एवढी असून शाओमी च्या वेबसाईटवर हा टीव्ही तुम्हाला अवघ्या 9,749 रुपयांमध्ये मिळू शकते. या स्मार्ट टीव्ही ची साईज 32 इंच असून यावर तुम्हाला चेक आउट करताना पाचशे रुपये सूट मिळू शकते.

२) Xiaomi smart Tv 5A-

शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही 32 इंच असून त्याची किंमत 24,999 रुपये एवढी आहे. परंतु वेबसाईटवर तुम्हाला हा टीव्ही सुद्धा फक्त 11,249 रुपयांमध्ये मिळू शकते. त्याचबरोबर या स्मार्ट टीव्ही सोबत ग्राहकांना 1,999 रुपयाचा स्मार्ट स्पीकर फ्री मिळत आहे.

३) Xiaomi Smart TV X43

हा स्मार्ट टीव्हीची किंमत 42,999 आहे परंतु ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून अवघ्या 25,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. शाओमी कंपनीकडून या टीव्ही सोबत आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देण्यात आलेला आहे.

४) Xiaomi Smart TV 5A 43

हा स्मार्ट टीव्ही 43 इंचाचा आहे. या मिडल रेंज स्मार्ट टीव्हीची किंमत 35 हजार 999 असली तरी ग्राहकांना फक्त 20,999 किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीवर सुद्धा ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देण्यात आलेला आहे.

५) Redmi Smart Tv X43

हा 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 42,999 रुपये असली तरी ग्राहक अवघ्या असून 22,499 रुपयांमध्ये तो खरेदी केयू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला या स्मार्ट टीव्ही सोबत 1,999 रुपयांचा स्मार्ट स्पीकर देण्यात येत आहे.