टाइम्स मराठी । रेडमी (Redmi) कंपनीचे स्मार्टफोन भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. पण या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही (Smart TV) सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात रेडमीचे स्मार्टटीव्ही खरेदी करण्याकडे भर देतात. आताही जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठा स्मार्ट टीव्ही हवा असेल तर रेडमीने नुकताच लाँच केलेला Redmi TV A50 2024 तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. 50 इंचाचा हा भलामोठा टीव्ही तुम्ही अवघ्या 15,500 रुपयांत खरेदी करू शकता.
काय आहेत फीचर्स –
Redmi TV A50 यामध्ये 50 इंच डिस्प्ले देण्यात आला असून 4k रिझोल्युशनसह हा टीव्ही उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या टीव्हीमध्ये 178 डिग्री वाईड व्हूईंग अँगल सुद्धा उपलब्ध आहे. हा टीव्ही ड्युअल डक्ट इन्हान्समेंट सह क्वॉर्डकोर A35 या प्रोसेसर वर काम करतो. यामध्ये MIUI ऑपरेटर सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबतच यात स्लीप डिझाईन सह मेटल बिल्ड आणि बेझल लेस डिझाईन देखील उपलब्ध आहे. Redmi TV A50 या टीव्ही मध्ये कनेक्टिव्हिटी साठी वायफाय सपोर्ट, एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, एंटीना आणि एक AV पोर्ट देण्यात आला आहे.
1.5 GB रॅम आणि 8 GB स्टोरेज-
Redmi TV A50 या टीव्ही मध्ये 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. एवढेच नाही तर दहा डब्लू स्पीकर देखील यामध्ये देण्यात आले आहे ज्यामुळे टीव्ही मधून क्लीन आणि स्पष्ट आवाज येऊ शकतो. एवढेच नाही तर यामध्ये एक स्मार्ट असिस्टंट देण्यात आला आहे. हा असिस्टंट म्हणजे जिओ चा AI असून त्याच्या माध्यमातून युजर्स फक्त आवाज देऊन स्मार्ट डिव्हाईस नियंत्रित करण्याची अनुमती देते. म्हणजे तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल आणि फक्त आवाज दिला तुम्ही तुमची स्मार्ट टीव्ही नियंत्रित करू शकतात.
दरम्यान, Redmi TV A50 हे सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेली असून याची किंमत CNY 1,349 म्हणजेच भारतीय करन्सी नुसार 15,500 एवढी आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये ही टीव्ही केव्हा लॉन्च होणार आहे हे अजून सांगण्यात आलेले नाही. परंतु लवकरच हा स्मार्ट टीव्ही भारतात सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे.