Redmi Watch 4 स्मार्टवॉच लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध

टाइम्स मराठी । Xiaomi कंपनीने 29 नोव्हेंबरला घेतलेल्या लॉन्चिंग इव्हेंट मध्ये सब ब्रँड  Redmi या ब्रांचे बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले. या आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंट मध्ये स्मार्टफोन सिरीज सोबतच कंपनीने स्मार्टवॉच देखील लॉन्च केलं आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉचचे नाव Redmi Watch 4 आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच चीनमध्ये लॉन्च केली असून विक्री देखील सुरू करण्यात आली आहे. आता लवकरच भारतात सुद्धा हे स्मार्टवॉच लॉन्च होऊ शकते. आज आपण या स्मार्टवॉचचे खास फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Redmi Watch 4 मध्ये 1.97 इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 390/450 पिक्सेल रिझॉल्युशन आणि 600 nits पीक ब्राईटनेस ऑफर करतो. या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने 470 mAh पावरफुल बॅटरी उपलब्ध केली आहे. ही बॅटरी 20 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. म्हणजे तुम्ही बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 20 दिवसापर्यंत बॅटरी चार्ज करण्याचे टेन्शन नाही. हे स्मार्टवॉच HyperOS वर वर्क करते.

फिचर्स– Redmi Watch 4

Redmi Watch 4 मध्ये 150 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. यासोबतच स्मार्टवॉच व्हॉइस कोच फीचर देखील यामध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉच च्या माध्यमातून तुम्ही डेली ऍक्टिव्हिटीज देखील ट्रॅक करू शकतात. या स्मार्टवॉच मध्ये स्ट्रेस, हार्ट रेटिंग, ऑक्सीजन, स्लीप मॉनिटर  यासारखे बरेच फिचर्स उपलब्ध आहे. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही  तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकता.

किंमत किती?

Redmi Watch 4 हे स्मार्टवॉच कंपनीने एलिगेंट ब्लॅक आणि सिल्वर व्हाईट कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने ही स्मार्टवॉच 499  युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 5,957 रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये स्पोर्ट्स स्क्वायर डायल विथ ॲल्युमिनियम फ्रेम दिली आहे. लवकरच हे स्मार्टवॉच भारतामध्ये देखील लॉन्च होऊ शकते.