सरकारच्या आयुष्मान कार्डचा लाभ घ्यायचा आहे?? अशा पद्धतीने करा नोंदणी 

टाइम्स मराठी । केंद्र सरकारकडून  देशातील नागरिकांना वेगवेगळ्या सुख सुविधा मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांना मदत मिळेल हा एक उद्देश असतो. कोरोना महामारीच्या काळापासून लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढताना दिसून येत आहे. या आजारावर उपचार घेणे काही व्यक्तींना शक्य होते तर काही व्यक्तींना शक्य होत नाही.  कारण आर्थिक परिस्थिती चांगली नसते. म्हणूनच  देशातील प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने एक खास योजना आखली आहे. जेणेकरून  प्रत्येक व्यक्ती उपचार घेऊ शकेल. या योजनेचे नाव  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

   

या आजारांवर केले जातील उपचार

या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये, कोरोना, कर्करोग, मूत्रपिंड, ह्रदय, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हीप प्रत्यारोपन, वांध्यत्व, मोतीबिंदू आणि इतर गंभीर आजारांवर उपचार केले जातात. म्हणजेच तुम्ही या गंभीर आजारांवर सरकारी  हॉस्पिटलमध्ये  फ्री मध्ये उपचार करू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून एक कार्ड असणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने समजेल कोणत्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे योजना 

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतच्या वेबसाईटवर सर्वात अगोदर भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रोग, मोबाईल नंबर आणि कोणत्या भागात राहतात याबद्दल सर्व डिटेल्स भरावे लागतील. हे डिटेल्स भरल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी उघड होईल. ज्या ठिकाणी हॉस्पिटलचे नाव आणि पत्ता दिलेला असेल. या यादीनुसार तुम्ही ही योजना कोण कोणत्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे हे तपासू शकतात.

हे व्यक्ती घेऊ शकतात या योजनेचा लाभ

आयुष्मान भारत योजनेचा लाभ कच्च्या घरात राहणारे व्यक्ती, भूमीहीन व्यक्ती, अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक,  ग्रामीण भागात राहणारे व्यक्ती, ट्रान्सजेंडर, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती घेऊ शकतात. म्हणजेच या योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार फक्त याच व्यक्तींना आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर घराजवळ असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्र जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल.

अशा पद्धतीने मिळवा आयुष्मान कार्ड

1) आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जा.

2) mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड एंटर करा.

3) यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक OTP येईल. हा OTP या ठिकाणी टाका.

4) OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. या पेजवर देण्यात आलेले  राज्य, नाव, मोबाईल नंबर, रेशन कार्ड  यासारखे डिटेल्स पूर्णपणे भरा.

5) याशिवाय उजव्या बाजूला तुम्हाला फॅमिली मेंबर टॅब दिसेल. या टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्व लाभधारकांची नावे जोडू शकतात.

6) यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळेल. हे कार्ड तुम्ही डाऊनलोड करून  कोणत्याही सरकारी रुग्णालयामध्ये वापरू शकता.