टाइम्स मराठी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून दिवसेंदिवस तंत्रज्ञान वेगवेगळ्या पायऱ्या गाठत आहे. सध्या तरी संपूर्ण जगात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरु आहे . ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता Google, Apple, Baidu सारख्या कंपन्यांनी त्यांच्या Generative Artificial Intelligence ची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत आपला भारत देश सुद्धा मागे राहणार नाही. याचे कारण म्हणजे प्रसिद्ध कंपनी रिलायन्स ChatGPT ला टक्कर देण्यासाठी BharatGPT लाँच करणार आहे. यावर सध्या काम सूरु असल्याची माहिती रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली आहे.
BharatGPT विकसित करण्यासाठी रिलायन्स जिओ लवकरच IIT बॉम्बेसोबत भागीदारी करणार आहे. आयआयटी बॉम्बेच्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना आकाश अंबानी यांनी म्हंटल कि, भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक जबरदस्त इको सिस्टीम तयार करण्याची गरज आहे. यासाठी रिलायन्स जिओ Jio 2.0 व्हिजन तयार करत आहे. रिलायन्स जिओचे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयने तयार केलेल्या चॅटजीपीटीला टक्कर देऊ शकते. BharatGPT हे मोठ्या भाषेच्या मॉड्यूलवर देखील काम करेल. परंतु यावेळी आकाश अंबानी यांनी याबाबत अधिक माहिती सांगितली नाही.
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल आहे. हा एक चॅटबॉट आहे, जो अनेक प्रश्नांची उत्तरे देतो तसेच आपल्याला लिखाण करायला सुद्धा मदत करते. ChatGPT च्या मदतीने तुम्ही सोशल मीडियावरील पोस्ट्सपासून ते अक्षरे इत्यादी सर्व काही मिळवू शकता. तसेच तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरे सापडत नसतील तर तुम्ही ChatGPT च्या मदतीने ते मिळवू शकता. OPEN AI नावाच्या कंपनीने हे ChatGPT विकसित केले आहे.