Whatsapp वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कंगाल व्हाल

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपवर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम केली जातात. परंतु आजकाल मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत आहेत. आतापर्यंत फेसबुक इंस्टाग्राम ॲप हॅकिंग बद्दल तुम्ही ऐकलं असेल. परंतु आता तुमचं व्हाट्सअप सुद्धा हॅकिंग चा शिकार होऊ शकतं. पण अशावेळी घाबरून न जाता फक्त काही गोष्टींवर लक्ष्य ठेवणं गरजचे आहे. त्यासाठी नेमकं काय करायला हवं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

   

१) अनोळखी कॉल रिसिव्ह करू नये –

जर तुम्हाला व्हाट्सअप वर अनोखी नंबर वरून व्हिडिओ कॉल येत असेल तर चुकूनही हा कॉल रिसीव करू नका. कारण व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून फ्रॉड व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो. आणि तुम्ही घाबरल्यावर तुमच्याकडून बँक डिटेल, पैशांची मागणी करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आलेला कॉल उचलणे गरजेचे आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला आलेला अनोळखी नंबर तपासून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत तुम्ही चॅट करून व्हिडिओ कॉल चे कारण विचारू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकतात.

२) व्हाट्सअप वर उपलब्ध आहे कॉल सायलेंट करण्याचे फिचर

जर तुम्हाला एकाच नंबर वरून कंटिन्यू कॉल येत असेल तर तो नंबर तुम्ही ब्लॉक करणे गरजेचे आहे. व्हाट्सअप वर अनोळखी नंबर किंवा कॉल सायलेंट करण्याचा फिचर जोडण्यात आलं आहे. त्यानुसार तुम्ही वारंवार येणारा कॉल सायलेंट करू शकतात.

३) पर्सनल डेटा शेअर करू नका-

काहीही झालं तरीही स्वतःच पर्सनल डिटेल शेअर करू नका. असं केल्यास तुम्ही स्वतः या स्कॅम मध्ये फसू शकतात. त्याचबरोबर बँकिंग डिटेल्स पासवर्ड कोणत्याच अनोळखी नंबर सोबत शेअर करणं तुम्हाला कंगाल करू शकत

४) अनोळखी नंबर वरून आलेली लिंक ओपन करू नका

व्हाट्सअप वर वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत, या फीचर्स ची माहिती घेऊन तुम्ही अनोखी नंबर, फ्रॉड कॉल, स्पॅम कॉल ओळखू शकतात. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर वरून लिंक पाठवण्यात आली असेल तर त्या लिंक वर क्लिक करू नका. कारण त्या लिंकच्या माध्यमातून स्पाईवेअर या प्रकारचे व्हायरस असू शकतो.

५) टू स्टेप वेरिफिकेशन

व्हाट्सअप वर टू स्टेप वेरिफिकेशन हे फीचर देण्यात आलेले आहे. हे फीचर सेक्युरिटीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. याचा वापर करून देखील तुम्ही तुमचे व्हाट्सअप सुरक्षित करू शकतात.