Renault India च्या ‘या’ 3 मॉडेल वर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून अनेक कंपन्या वेगवेगळ्या प्रॉडक्टवर डिस्काउंट ऑफर उपलब्ध करत आहे. भारतामध्ये फेस्टिवल सीजन मध्ये कार खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार तुम्ही देखील या फेस्टिवल सीझनमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेनॉल्ट इंडियाने काही कार मॉडेलवर स्पेशल ऑफर सुरु केली आहे. त्यानुसार बंपर डिस्काउंट च्या माध्यमातून तुम्ही या कार खरेदी करू शकतात. जाणून घेऊया कंपनी कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची सूट देत आहे.

   

Renault India ही कार निर्माता कंपनी ग्राहकांना फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) आणि ट्रायबर (Renault Triber) या कारवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे. या सोबतच रेनॉल्ट किगर (Renault Kiger) वर 65 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यामध्ये कंपनीने लॉयल्टी बोनस, एक्सचेंज ऑफर, कॅश डिस्काउंट ऑफर आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील  उपलब्ध केला आहे. यासोबतच कंपनीने वॉरंटी देखील उपलब्ध केली आहे.  भारतात Renault च्या नऊ लाख ग्राहकांना रॉयल्टी बोनस उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत वॉरंटी आणि तीन वर्षांसाठी पॅकेज उपलब्ध करण्यात येणार आहे. हे रॉयल्टी पॅकेज कोणताही वाहनांसाठी उपलब्ध करण्यात आले असून यासोबत डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येत आहे.

या स्पेशल ऑफरवर Renault Indiaचे सुधीर मल्होत्रा यांनी सांगितलं की, फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून आमच्या कंपनीच्या तीन मॉडेलवर बंपर सूट देण्याची घोषणा करत आम्हाला गर्व होत आहे. या फेस्टिवल सिझनचा लाभ घेत ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने कार खरेदी करणे हे आमचे लक्ष आहे. रेनॉल्ट इंडियाच्या ट्रायबल किगर आणि क्विड या मॉडेलवर स्पेशल ऑफर उपलब्ध करण्यात आले आहेत. या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून रेनॉल्टच्या ड्रायव्हिंगचा आनंद ग्राहकांनी घ्यावा.

Renault Kwid वर 20,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच कंपनीने 20000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि रॉयल्टी बोनस देखील उपलब्ध केला आहे. कंपनीने Renault Kiger वर देखील कंनीने 25 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे. 20000 रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि लॉयल्टी बोनस सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळत आहे. रेनॉल्ट इंडियाच्या Renault Triber वर कंपनीने 20000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट उपलब्ध केला आहे. यासोबतच 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस या कारवर देण्यात येत आहे.

रेनॉल्ट इंडियाने कॉर्पोरेट ग्राहकांसाठी 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध केली आहे. ही ऑफर  कॉर्पोरेट आणि PSU यांच्यासाठी असून यामध्ये शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण ग्राहक यांचा समावेश होतो. यांच्यासाठी कंपनीकडून 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच रेनॉल इंडियाचे वाहन खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तींनी ग्राहकांना रेफर केले असेल त्यांना 10,000  रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.