टाइम्स मराठी | वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई पाहता सर्वसामान्य नागरिकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये जास्त आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा आकर्षक लुक डिझाईन आणि पैशाची होणारी यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. भारतीय बाजारात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या असल्याने मार्केट मध्ये सर्व कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची गाडी लाँच करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत
सध्या इलेक्ट्रिक कार बद्दल बोलायचं झालं तर या कारचा मेंटेनन्स देखील कमी येतो. एवढेच नाही तर इलेक्ट्रिक कारची लाईफ देखील जास्त असते. इलेक्ट्रिक कार ची सुरुवाती किंमत जास्त असली तरी देखील पेट्रोल डिझेल वाल्या कार पेक्षा जास्त स्वस्तात मिळते. सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक कार एकापेक्षा एक वरचढ दिसत आहेत. त्यातच Tiago आणि Nexon या दोन्ही इलेक्ट्रिक कारला टक्कर देण्यासाठी कोणतीच कार उपलब्ध नाही. परंतु आता टाटाच्या या इलेक्ट्रिक कारला टक्कर देण्यासाठी नवीन कार लॉन्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कारची किंमत टाटा टियागो पेक्षा देखील कमी आहे.
टाटाला टक्कर देण्यासाठी येणार ही कार
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय बाजारपेठेमध्ये रेनॉल्ट क्विड इव्ही ही कार परवडणाऱ्या किमतीमध्ये लॉन्च होऊ शकते. ही कार CMF-A आर्किटेक्चरवर तयार करण्यात येणार आहे. 2024 किंवा 2025 पर्यंत ही कार लॉन्च होईल असं सांगण्यात येत आहे. रेनॉल्ट क्विड इव्ही दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात येऊ शकते.
रेनॉल्ट क्विडचे फीचर्सचा लूक आणि फीचर्स-
भारतीय बाजारपेठेमध्ये रेनॉल्ट क्विड इव्ही ही कार सिंगल चार्जवर 300 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. या कालच्या फीचर्स आणि लुक बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये वेगळ्या प्रकारची ग्रील आणि हेडलॅम्प यासोबतच अपडेटेड फ्रंट आणि रियर बंपर, नवीन टेल लॅम्प देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर या कार मध्ये 26.8 kwh बॅटरी पॅक असू शकतो. ही बॅटरी 44 Hp पावर आणि 125 न्यूटन मीटर पर्यंत टॉर्क जनरेट करू शकते.
रेनॉल्ट क्विड EV ही कार बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकली गेली असून ICE कार बदलण्यासाठी बरेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. या कारमध्ये मागे असलेली इंधन टाकी काढून टाकण्यात आली असून त्या ठिकाणी प्लेन जागा मिळाली आहे. ज्यामुळे बॅटरी बसवण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासोबतच सस्पेन्शन बदलून ते मजबूत बनवण्यात आले आहे. ज्यामुळे कार जास्त लोड सहन करू शकेल. या इलेक्ट्रिक कार मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध करण्यात येऊ शकतात. ही कार पूर्णपणे डिजिटल दिसेल. यासोबतच चार ड्रायविंग मोड देखील यामध्ये उपलब्ध असतील.