लाँच झाली स्वस्तात मस्त 7 सीटर कार; मारुती अर्टिगाला देणार टक्कर

टाइम्स मराठी । भारतात 7 सीटर कारची चांगलीच चलती आहे. खास करून मित्रांसोबत किंवा कुटुंबासह बाहेर फिरायला जायचं म्हंटल तर ७ सीटर कार सर्वात बेस्ट पर्याय ठरते, त्यामुळे या गाड्या बाजारात मोठ्या प्रमाणात खपतात. सध्या मारुती सुझुकीची एर्टिगा ही देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते, मात्र आता रेनॉल्ट कंपनीने स्वस्तात मस्त अशी नवी कार भारतात लाँच केली असून लोकांच्या चांगलीच पसंत पडू शकते. Renault Triber असे या गाडीचे नाव असून आज आपण तिचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

Renault Triber च्या या नव्या एडिशनमध्ये 1-लिटर नॅचरली एस्पिरेटेड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन 72 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे.

कारच्या फीचर्स बद्दल सांगायचं झाल्यास, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, ऑडिओ कंट्रोल्स आणि मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर सीट आर्मरेस्ट, पॉवरफोल्ड बाहेरील रियर-व्ह्यू मिरर, रियर सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कारच्या सिक्युरिटी बद्दल सांगायचं झाल्यास, Renault Triber 4-स्टार GNCAP सुरक्षा रेटिंगसह येते. यामध्ये तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम, हिल स्टार्ट असिस्ट , चार एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एबीएस विथ ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर., यासारख्ये सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती?

कंपनीने या अपडेटेड Renault Triber ची एक्स-शोरूम किंमत 5,99,500 रुपयांपासून ते 8,74,500 रुपयांपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे ही 7 सीटर कार देशातील सर्वात स्वस्त कार ठरली असून बाजारात ती मारुती अर्टिगाला जोरदार टक्कर देईल हे नक्की