क्रिकेटप्रेमींसाठी आली नवी Electric Bike; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र फेस्टिवल सीझनचा माहोल दिसत आहे. अशातच तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल आणि या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून  दिवाळीला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारपेठेमध्ये एक नवीन अप्रतिम बाईक लॉन्च करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनी रिवोल्ट मोटर्स ने RV400 या इलेक्ट्रिक बाइकचे क्रिकेट स्पेशल एडिशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे.  कंपनीने ही बाईक खास क्रिकेट लव्हरसाठी डिझाईन केली आहे.

   

डिझाईन

रिवोल्ट RV400 या स्पेशल एडिशन बाईकला अप्रतिम डिझाईन आणि अट्रॅक्टिव्ह कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहे. या बाईकला लाईट वेट सिंगल कार्डवर फ्रेममध्ये डिझाईन करण्यात आले असून ओव्हल शेप मध्ये LED प्रोजेक्टर हेडलाईट देण्यात आले आहे. भारतात सध्या क्रिकेट वर्ल्डकपची धूम सुरू आहे. त्यानुसार कंपनीने क्रिकेट टीमची जर्सी या बाईक सोबत मॅच करत इंडिया ब्ल्यू शेड पेंट स्कीममध्ये बाईकला नवीन लूक दिला आहे.

फीचर

रिवोल्ट RV400 या बाईक मध्ये मस्क्युलर फ्युएल टॅंक, स्टेप अप सिंगल पीस सीट, एक पिलर ग्रॅब रेल, एलईडी हेडलाईट, एलईडी टेललाईट, DRDLD, टर्न सिंगल लॅम्प,  लो बॅटरी इंडिकेटर्स हे फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच कंपनीने या बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि 17 इंचचे अलॉय व्हील उपलब्ध केले आहेत.

बॅटरी

रिवोल्ट  RV400 या क्रिकेट एडिशन बाईक मध्ये 3 kwh बॅटरी बसवण्यातआली आहे. ही बॅटरी कंपनीने इलेक्ट्रिक मोटरसह कनेक्ट केली आहे. ही बॅटरी 170 nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटर एवढी रेंज देते. रिवोल्ट कंपनीच्या बिजनेस चेअर पर्सन अंजली रतन म्हणाले की, आम्ही 2023 वर्ल्ड कप मध्ये भारतीय क्रिकेट टीम प्रति अतूट सहकार्याच्या माध्यमातून RV400 या बाईकचे क्रिकेट स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. हे स्पेशल एडिशन इको फ्रेंडली, प्रीमियम एक्सपिरीयन्स प्रदान करते. यासाठी टेक्नॉलॉजी आणि स्टाईल दोन्हीकडे लक्ष देण्यात आले आहे. इंडिया ब्ल्यू कलर हा फक्त कलर नसून ही एक घोषणा आहे.