सुशांतसिंह नंतर रिया ‘या’ व्यक्तीला करत आहे डेट

टाइम्स मराठी । बॉलीवूड मध्ये सेलिब्रिटी हे चित्रपटांमुळे कमी तर त्यांच्या रिलेशनशिप आणि अफेयर्स मुळे जास्त चर्चेत असतात. यातच आता अभिनेत्री रिया चक्रवती (Rhea Chakraborty) देखील चर्चेत आली आहे. दिवंगत सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतची गर्लफ्रेंड म्हणून तिला अजूनही बरेच जण ओळखतात. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर रिया चक्रवतीवर बरेच आरोप करण्यात आले होते. या काळात तिला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. एवढेच नाही तर तिला तुरुंगात देखील जावे लागले. आता हे सर्व काही विसरून रिया चक्रवती तिचे आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता ती कोणाला तरी डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.

   

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका श्रीमंत उद्योजकाला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवती सध्या निखिल कामत याला डेट करत असून निखिल हा झिरोधा कंपनीचा मालक आहे. यापूर्वी अभिनेत्री रिया चक्रवतीने क्रिकेटर विराट कोहलीच्या मॅनेजरला म्हणजेच बंटी सजदेहाला देखील डेट केलं असल्याची चर्चा होती. याबाबत रियाने कधीच उघडपणे सांगितलं नाही.

निखिल आधी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ला करत होता डेट

निखिल कामतने रिया चक्रवतीला डेट करण्यापूर्वी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ला डेट केले होते. मानुषी आणि निखिल ला एकत्र स्पॉट देखील करण्यात आले होते. त्या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या दोघांनी एकमेकांना एक वर्ष डेट केलं होतं परंतु त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता रिया चक्रवर्ती आणि निखिल कामात यांच्या रिलेशन बद्दल चर्चा रंगली आहे.

दरम्यान, रिया चक्रवती सध्या एमटीवी वर सुरू असलेल्या रोडीज मध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या शोमध्ये एका गॅंग लीडरच्या भूमिकेत असून तिच्यासोबत प्रिन्स नरूला गौतम गुलाटी आणि सोनू सूद देखील दिसत आहेत. रोडीज मध्ये रियाचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या अगोदर बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.