जगातील सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत; संपत्ती पाहून तुमचेही डोळे फिरतील

टाइम्स मराठी । आपल्या देशात भिकाऱ्यांची कमी नाही. मंदिरात जाताना, सिग्नल वर किंवा रस्त्याच्या कडेला आपल्याला रोज भिकारी दिसतात. आपण त्यांच्यावर दया दाखवून त्यांना काही पैसे देतो. पण तुम्ही कधी हा विचार केला की रोज या भिकाऱ्यांकडे किती पैसे जमा होत असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही भिकारी आपल्यापेक्षाही जास्त श्रीमंत असतात. त्यांच्या अवताराकडे बघून आपल्याला वाटणार देखील नाही की, त्यांच्याकडे प्रॉपर्टी, राहायला साधं घर सुद्धा असेल. पण हा आपला भ्रम असून मुंबईसारख्या शहरात एका भिकाऱ्याकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे आणि अपार्टमेंट मध्ये स्वतःच घर सुद्धा आहे. भिकारी जगातील सर्वात मोठा श्रीमंत भिकारी आहे. त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. त्याचबरोबर गाडी, बंगला स्वतःचा बिजनेस आणि बँक बॅलन्स सुद्धा आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण तरीही एवढं सगळं असून सुद्धा हा भिकारी अजूनही भीक मागतोय.

   

मुंबईमध्ये राहणाऱ्या या भिकाऱ्याचं नाव भरत जैन आहे. भीक मागून त्याने आत्तापर्यन्त 7.5 करोड रुपये संपत्ती गोळा केली आहे. मुंबईमध्ये 1.2 करोड रुपयांचा त्याचा हक्काचा फ्लॅट आहे. एवढेच नाही तर ठाण्यात दोन दुकाने आहे. या दुकानाच्या माध्यमातून त्याला 30 हजार रुपये मिळतात. आपण एवढं शिकून सुद्धा आपल्याकडे अजूनही स्वतःचा घर, बंगला, गाडी, प्रॉपर्टी नसेल. पण एका भिकाऱ्याकडे भीक मागून एवढी प्रॉपर्टी कस काय जमली असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

भरत जैन हा भिकारी भीक मागून महिन्याला 60-75 हजार रुपये कमवतो. हा भिकारी विवाहित असून त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली, एक भाऊ आणि त्याचे वडील हे आहे. त्याच्या दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण झालेलं असून भरत चं शिक्षण गरिबीमुळे पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे तो मुंबईमध्ये भीक मागून पैसे कमवू लागला. भरत हा शिवाजी टर्मिनल्स आणि आझाद मैदान या ठिकाणी भीक मागतो. बरेच लोक आता त्याला भीक मागण्यापासून थांबवतात पण तरीही तो ऐकत नसून एवढी संपत्ती असून देखील भीक मागतो.