या Electric Bike मध्ये कंपनीने अपडेट केलं रायडींग मोड; मिळणार 150 KM पेक्षा जास्त रेंज

टाइम्स मराठी । सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. बऱ्याच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळे मोड्स उपलब्ध केलेले असतात. जेणेकरून मोडच्या माध्यमातून बाईकची रेंज वाढवता येते. यासोबतच स्पोर्ट बाईक मध्ये सुद्धा बऱ्यापैकी फीचर्स आणि रायडिंग मोड दिलेले असतात. त्यानुसार आता टॉर्क मोटर्स या कंपनीने इलेक्ट्रिक बाइक KRATOS R मध्ये कंपनीने नवीन रायडिंग मोड अपडेट केले आहे. जेणेकरून या बाईकची रेंज वाढेल. चला तर याबाबत जाणून घेऊया..

   

मोड

KRATOS R या इलेक्ट्रिक बाइक मध्ये कंपनीने नवीन Eco Plus मोड उपलब्ध केला आहे. यामुळे इलेक्ट्रिक बाइकची रेंज 150 किलोमीटर पेक्षा जास्त वाढेल. यापूर्वी या इलेक्ट्रिक बाइकची रेंज यापेक्षा कमी होती. आता या मोडमुळे 120 किलोमीटर जास्त रेंज ही इलेक्ट्रिक बाईक देईल. या इलेक्ट्रिक बाइक ची IDC रेंज ही 180 किलोमीटर एवढी आहे. इको + मोड मध्ये या बाईकचे टॉप स्पीड 35 किलोमीटर प्रति तास इतकं असेल.

KRATOS R या इलेक्ट्रिक बाइक मध्ये उपलब्ध करण्यात आलेला इको प्लस मोड हा शहरी भागांमध्ये उपयोगी आहे. या मोडमध्ये हाय स्पीड पेक्षा रेंजला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. यापूर्वी या बाईक मध्ये इको, सिटी, आणि स्पोर्ट हे तीन रायडींग मोड उपलब्ध होते. आता यामध्ये Eco Plus यासह रिवर्स मोड देखील उपलब्ध करण्यात आला आहे. जेणेकरून पार्किंग करताना सोप्या पद्धतीने बाईक पार्क करता येईल.

बॅटरी

KRATOS R या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 9 kw मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 38 nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर यामध्ये 4 KWH लिथियम आयन बॅटरी पॅक उपलब्ध करण्यात आला असून ही बॅटरी IP67 सर्टिफाइड आहे. ही बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जिंग च्या माध्यमातून एक तास लागतो. एक तासांमध्ये ही बॅटरी शून्य ते 80 टक्के चार्ज होते. ही बाईक तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

फिचर्स

KRATOS R या इलेक्ट्रिक बाईकमध्ये फुली LED लाईट, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, मोबाईल कनेक्टिव्हिटी, USB चार्जिंग, अँटिथेप्ट, फ्रंट स्टोरेज बॉक्स, OTA अपडेट यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच जिओ फेसिंग, फाइंड माय व्हिकल, मोटर वॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, ट्रॅक मोड, स्मार्ट चार्ज, मल्टीराईड मोड, फास्ट चार्जिंग, इन ॲप नेवीगेशन, ब्लूटूथ लाईव्ह डॅशबोर्ड एक्सेस , अँटीथेप्ट सेफ गार्ड्स यासारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.