280 KM रेंज देणारी Electric Scooter लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा आज-काल इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स ने इलेक्ट्रिक वाहन निर्माण करत आहे. अशातच आता आणखीन RIVOT MOTORS कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. लॉन्च करण्यात आलेली ही स्कूटर  लॉंग रेंज मध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर चे नाव Rivot NX100 आहे. कंपनीने ही स्कूटर पाच व्हेरिएंट मध्ये लॉन्च केली आहे. जाणून घेऊया या  इलेक्ट्रिक स्कूटर चे स्पेसिफिकेशन आणि तिच्या किमतीबाबत….

   

280 KM रेंज –

Rivot NX100 ने लॉन्च केलेली इलेक्ट्रिक स्कूटर 3.5 kWh लिथियम आयन बॅटरीने सुसज्ज आहे. ही लिथियम आयन बॅटरी चार ते पाच तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 280 किलोमीटर रेंज देते. ही इलेक्ट्रिक स्कुटर अवघ्या 3.5 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रतितास रेंज पकडते.

फिचर्स

Rivot NX100 या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बरेच आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. त्यानुसार यात LED लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिस्क ब्रेक यासारखे फीचर्स  देण्यात आले आहे. यासोबतच TPMS म्हणजे tyre pressure monitoring system, क्रश कंट्रोल हे फीचर्स स्कूटर ला जास्त सुरक्षित आणि सुविधाजनक बनवतात.

कलर ऑप्शन

Rivot NX100 ही इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1, ATHER 450X आणि Hero Vida V1 या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर सात कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली आहे. त्यानुसार यामध्ये ब्लॅक, व्हाईट, ग्रे, मिनरल ग्रीन, पिस्ता, पिंक आणि पर्पल हे ऑप्शन उपलब्ध आहेत.

किंमत किती?

Rivot NX100 या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये 89,000 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर पाच व्हेरियंट मध्ये उपलब्ध केली आहे. त्यानुसार यात  classic, premium,  Elite, sports and offlander हे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.