Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा लैंगिक विषयावर त्या रोबोटची संवाद साधू शकेल.

   

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुगलचे माजी अधिकारी मोहम्मद ‘मो’ गावदत यांनी सांगितले की, AI लवकरच Apple च्या Vision Pro किंवा Quest 3 सारख्या विशेष हेडसेटचा वापर करून आभासी वास्तवात लैंगिक अनुभव देणार आहे. या रोबोटसोबत वास्तविकतेत संवाद साधता येईल. यामुळे वेगळे काहीतरी केल्याचा अनुभव आपल्याला मिळेल. तसेच, “AI रोबोटसोबत आपण मानवी व्यक्तीशी संवाद साधत असल्यासारखे बोलू शकतो. हे रोबोट आपल्याला एका जिवंत व्यक्तीची जाणीव करून देतील ज्याच्याशी आपण सर्व काही शेअर करत करु. पुढे जाऊन AI च्या विकासामुळे प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल विचार करण्याची पद्धत देखील बदलणार आहे. तंत्रज्ञानाच्या जसजशा सुधारणा होतील तसतसे मानव आणि यात फरक सांगणे आपल्याला कठीण होऊन बसेल”

या मुलाखतीत बोलत असताना गावदत यांनी म्हणले की, एआय पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) आपल्या आयुष्यात अशा प्रकारे प्रवेश करतील की, ज्यामुळे वास्तविक पार्टनर्स निघून जातील. कधीकधी ज्या गोष्टी वास्तविक नाहीत, त्यांच्याद्वारे आपल्या मेंदूला आपण फसवू शकतो. हे एआय पॉवर्ड सेक्स रोबोट्स तसेच काम करतील. यामुळे आपल्या खऱ्या आयुष्यात पार्टनरची जागा
रोबोट्स घेऊ शकतील.

दरम्यान सध्या AI बॉट्सला संवेदनशील मानण्यात यावे की नाही याबद्दल सतत वादविवाद चालू आहे. दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये लक्षणीय प्रगती होताना दिसत आहे. आताच्या आधुनिक काळात व्यापारात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जागा घेतली आहे. अशातच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मानवाच्या वैयक्तिक आयुष्यात देखील शिरकाव केला आहे.