Royal Enfield Bullet 350 अपडेटेड व्हर्जनमध्ये येणार, तरुणांना आकर्षित करणार गाडीचा लूक; किंमत किती?

टाइम्स मराठी । Royal Enfield Bullet ही टू व्हीलर बाईक आजच्या तरुण पिढीतील आकर्षण ठरत आहे. ही बाईक भारतातील प्रीमियम टू व्हीलर सेगमेंटमध्ये अती लोकप्रिय बाईक असुन रॉयल एनफिल्ड मोटर्स ही भारतीय मोटारसायकल निर्माण कंपनीची बाईक आहे. रॉयल इन्फिल्ड बुलेटला ग्राहकांची नेहमीच पसंती मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन सप्टेंबर महिन्यामध्ये रॉयल एनफिल्डचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहे. ही नवीन रॉयल एनफिल्ड 350 बुलेट मिलिटरी कलर म्हणजे रेड आणि ब्लॅक, स्टॅंडर्ड कलर म्हणजेच ब्लॅक आणि मरून, आणि ब्लॅक गोल्ड यासारख्या वेरियंट मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या बुलेटची एक्स शोरूम किंमत 1.7 लाख रुपये आहे.

   

Royal Infield 350 डिझाईन –

Royal Infield 350 या नवीन बुलेट मध्ये जे फ्रंट आणि रियल लुकमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेमध्ये ही नवीन जनरेशनची बुलेट वेगवेगळ्या फीचर्स ने परिपूर्ण आहे. यामध्ये पायलट लॅम्प, हेडलॅम्प, इंटिग्रेटेड रिफ्लेक्टर आणि टेल लॅम्प हे सर्व नवीन डिझाईन केले आहे. तुम्हाला या बुलेटच्या इंधन टाकीमध्ये काही आकर्षक ग्राफिक देखील बघायला मिळतील. यासोबतच किरकोळ बदल देखील यामध्ये करण्यात आलेले असून नियो रेट्रो डिझाईन यामध्ये उपलब्ध आहे.

Royal Infield 350 फिचर्स

Royal Infield 350 ही न्यू जनरेशन बुलेट सिंगल सीट मध्ये उपलब्ध असून ही आरामदायक आणि लांब असू शकते. यामध्ये नवीन ग्राब्रेल देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बाईक मध्ये डिजिटल अनलॉक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले असून यात एलसीडी इन्फॉर्मेशन पॅनल असेल. यासोबतच मोबाईल चार्जिंग साठी यूएसबी पोर्ट टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क आणि ट्विन गॅस चार्ज्ड रियर शॉक्स, सिंगल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आली आहे.

Royal Infield 350 स्पेसिफिकेशन

Royal Infield 350 या न्यू जनरेशन बुलेट मध्ये 350cc J-सिरीज इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजन 20.2bhp मॅक्झिमम पॉवर सह 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअर बॉक्सला जोडलेले आहे. त्याचबरोबर या बुलेटमध्ये कमी व्हायब्रेशन आणि नॉईज बघायला मिळेल. तसेच मायलेज सुद्धा तुम्हाला उत्तम मिळेल.