Royal Enfield Himalayan 450 लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीची बुलेट तरुण पिढीला प्रचंड भावते. देशभरातील युवकांचा रॉयल एनफिल्ड घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. आता कंपनीने रॉयल एनफिल्डने चाहत्यांसाठी नवीन बाईक लॉन्च केली आहे. गोवा येथील मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने Royal Enfield Himalayan 450 ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची सुरुवातीची किंमत 2.69 लाख रुपये एवढी ठेवली आहे. आणि या बाईकच्या टॉप मॉडेल ची किंमत 2.84 लाख रुपये एवढी आहे. आज आपण या बुलेटचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन- Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Himalayan 450 या नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या बाईक मध्ये कंपनीने 452cc लिक्विड कुल्ड DOHC सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससोबत येत असून 8000 RPM वर 39.5  hp मॅक्झिमम पॉवर आणि 5500 RPM वर 40 nm पीक टॉर्क जनरेट करते. एवढेच नाही तर या गिअरबॉक्स सोबतच असिस्ट आणि स्लीपर क्लच देखील देण्यात आला आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेंशन

Royal Enfield Himalayan 450 मध्ये फ्रंटला 43mm USD फोर्क्स, आणि पाठीमागील बाजूस फ्री लोड ऍडजेस्टेबल मोनोशॉक देण्यात आला आहे. या बाईक मध्ये ब्रेकिंग साठी फ्रंटला 320 mm सिंगल डिस्क, रियर ला 270 mm डिस्क  देण्यात आले आहे. या एडवेंचर बाईकचे वजन 196 किलोग्रॅम एवढे आहे. या बाईकमध्ये 17 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

फिचर्स

या बाईकमध्ये इंटिग्रेटेड गुगल मॅप, स्विचेबल रियर ABS,  रायडिंग मोड, डबल पर्पज वाले रियर टेल लाईट, चार इंच गोलाकार TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. या बाईक मध्ये देण्यात आलेले TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर टर्न इंडिकेटर्स चे देखील काम करते. गाडीच्या चारही बाजूनी LED लाईटचा वापर करण्यात आला आहे.