या देशात डबल किमतीत लाँच झाली Royal Enfield Himalayan 450

टाइम्स मराठी । तरुण आणि तरुणांईना बाईकचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. त्यातच ऑफ रोडींग बाइक्सला तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. या ऑफ रोडींग बाईकला भारतामध्ये काही वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या बाईक्स चा वापर करून आपण पहाडी रस्त्यांवर सुरक्षित राईड करू शकतो. आपल्या देशातील तरुणांमध्ये बुलेटची वेगळीच क्रेज बघायला मिळते. आता रॉयल एनफिल्ड ने युरोपीय मार्केटमध्ये नवीन Royal Enfield Himalayan 450 बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक यापूर्वी भारतातील मोटोवर्स इव्हेंट मध्ये लॉन्च करण्यात आली होती. भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत दुसऱ्या देशांमध्ये ही बाईक अत्यंत महाग आणि जास्त किमतीत विकली जात आहे. भारतामध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत 2.69 लाख रुपये आहे. आता ही किंमत इटली आणि फ्रान्समध्ये 5900 युरो म्हणजेच 5.30 लाख रुपयांना विक्री करण्यात येत आहे. आणि UK मध्ये हीच किंमत 6 लाख रुपयांच्या जवळपास आहे.

   

Royal Enfield Himalayan 450 पावरट्रेन

Royal Enfield Himalayan 450 या नवीन हिमालयन मध्ये कंपनीने 452 CC इंजिन दिले आहे. हे सिंगल सिलेंडर लिक्विड कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8000 RPM वर 29.57  BHP पावर आणि 40 ते 45 NM पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिन सोबत 6 स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध करून दिले आहेत. एवढेच नाही तर या सोबतच स्लिप अँड असिस्ट क्लच देखील उपलब्ध आहे. याला शेरपा 450 नाव देण्यात आले आहे.

फिचर्स

या नवीन बाईक मध्ये गोलाकार आकारात 4 इंच TFT डॅश देण्यात आले आहे. जेणेकरून तुम्ही ब्लूटूथच्या माध्यमातून फोन कनेक्ट करू शकतात. यामध्ये गुगल मॅप नेव्हिगेशन देखील उपलब्ध आहे. गुगल मॅप मुळे तुम्हाला योग्य लोकेशन मिळू शकते. याशिवाय म्युझिक प्ले बॅक देखील यामध्ये मिळते. म्युझिक प्लेबॅक हे बाईकच्या उजव्या स्विच क्यूब वर जॉईस्टिकच्या माध्यमातून मॅनेज करता येईल. 

 ग्राउंड क्लिअरन्स

Royal Enfield Himalayan 450 या बाईकमध्ये नवीन स्टील ट्वीन स्पर फ्रेम मिळते. यासोबतच 43 mm USD फोर्क, प्रीलोड ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन देखील देण्यात आले आहे. या बाईकचे ग्राउंड क्लिअरन्स 230mm एवढे असले तरी देखील स्टॉक सीटची उंची 825mm आहे. आणि ही उंची 805mm पर्यंत कमी केली जाऊ शकते.

 ब्रेकिंग सिस्टीम

या बुलेटच्या फ्रंटला 21 आणि रियरला 17 इंच व्हील देण्यात आले आहे. हे टायर खास करून नवीन हिमालयन साठी डिझाईन करण्यात आले आहे. या बाईच्या फ्रंटमध्ये 320 mm डिस्क ब्रेक आणि रियल मध्ये 270 mm डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे. म्हणजेच ही बाईक डिस्क ब्रेकच्या माध्यमातून कंट्रोल केली जाऊ शकते. आणि यामध्ये ड्युअल चॅनल ABS देखील उपलब्ध आहे.