Royal Enfield Himalayan 452 येणार नव्या अवतारात; इंजिनसह सगळंच काही बदलणार?

टाइम्स मराठी । चेन्नई स्थित ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये आकर्षक आणि मजबूत बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. ही बाईक दुसरी तिसरी कोणती नसून रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 नव्या अवतारात येणार आहे. या बाईक मध्ये इंजिन देखील नवीन बसवण्यात येण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊयात कंपनी कडून या बाईक मध्ये नेमके काय बदल करण्यात येऊ शकतात.

   

अपकमिंग Royal Enfield Himalayan 452 बाईकच्या फ्रंट मध्ये एलईडी लाइटिंग देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर अपसाईट डाऊन फोर्क सेटअप आणि रियर मध्ये प्रीलोड ऍडजेस्टेबल मोनो शॉक यासारखे फीचर्स देखील कंपनीकडून यात देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रायडींग साठी यामध्ये 21 इंच फ्रंट आणि 19 इंच रियल व्हील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोलसह ड्युअल चॅनल एबीएस देखील कंपनी देऊ शकते.

रॉयल एनफिल्डच्या या नव्या हिमालयन 452 बाईकमध्ये कंपनीकडून 451.65 CC इंजिन देण्यात येऊ शकते. हे इंजन 8000 RPM वर पावर जनरेट करेल अशी माहिती लीक द्वारे मिळाली आहे. सध्या उपलब्ध असलेली हिमालयन बाईक 6500 RPM वर पावर जनरेट करते. याशिवाय नव्या हिमालयन मध्ये नवीन चेसिस डेव्हलप करण्यात येऊ शकतात.

अपकमिंग Royal Enfield Himalayan 452 ही नेक्स्ट जनरेशन बाईक असणार आहे. बाईकचे वजन 394 kg असू शकते. हे मॉडेल 1510 MM व्हील बेस सह उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर हे व्हील बेस जास्त लांब असण्याची देखील शक्यता आहे. ही बाईक 2245 mm लांब, 852 mm रुंद, 1315 mm उंच असण्याची शक्यता आहे.