Royal Enfield Hunter 350 : फक्त 5015 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या Royal Enfield Hunter 350

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे स्पोर्ट बाईक टू व्हीलर उपलब्ध आहेत. परंतु सर्वात जास्त क्रेझ ही रॉयल एनफिल्ड हंटरची दिसते. रॉयल एनफिल्ड हंटर (Royal Enfield Hunter 350) ही बाईक खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. ही बाईक कॉलेज तरुण असो किंवा ऑफिस बॉय या सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. कंपनीची ही मिड सेगमेंट मधील जबरदस्त बाईक आहे. तुम्ही देखील यंदा ही ROYAL ENFIELD HUNTER 350 ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीकडून या बाईकवर EMI ऑप्शन उपलब्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तुम्ही ही बाईक फक्त 5015 रुपयांच्या EMI वर ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. ही फॅशनेबल बाईक असून अप्रतिम मायलेज देते. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन.

   

काय आहे ऑफर?

Royal Enfield Hunter 350 या बाईकची किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये 1.50 लाख रुपये एवढी आहे. तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डाऊन पेमेंटच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकतात. त्यासाठी 17000 रुपये डाऊन पेमेंट द्यावे लागेल. आणि त्यानंतर तीन वर्षांसाठी  9.7% व्याजदर वर प्रति महिना 5015  रुपये EMI द्यावा लागेल.

royal enfield hunter 350 01

स्पेसिफिकेशन- Royal Enfield Hunter 350

Royal Enfield Hunter 350 या बाईकमध्ये 349.34 cc bs6-2.0 सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 27 nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 20.4 ps हाय मायलेज देते. कंपनीने या बाईकमध्ये 13 लिटरचा मोठा फ्युल टॅंक उपलब्ध केला आहे. या बाईकचे वजन 177 किलोग्रॅम एवढे असून कमी किंमतीत चांगला परफॉर्मन्स देणारी बाईक म्हणून तुम्ही या गाडीकडे पाहू शकता. Royal Enfield Hunter 350 या बाईकमध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. त्यानुसार यामध्ये 17 इंच चे मोठे अलॉय व्हील देण्यात आले आहे.

फिचर्स

या बाईक मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ट्रिपर पॉड, यूएसबी पोर्ट, ओडोमीटर, फ्युएल गेज, 2 ट्रीप मीटर, मेंटेनन्स इंडिकेटर्स  या सर्व ऑप्शनसह डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. एवढेच नाही तर या बाईकमध्ये टेलिस्कोपी फोर्क, ड्युअल शॉक एब्जोर्बर  देण्यात आले आहे.  यामुळे बाईक राईड करत असताना आरामदायक प्रवास मिळतो.