Royal Enfield Shotgun 650 भारतात लाँच; 3.59 लाख रुपये किंमत

Royal Enfield Shotgun 650 । प्रसिद्ध स्पोर्ट बाईक निर्माता कंपनी Royal Enfield ने आपली Shotgun 650 अपडेटेड फीचर्ससह बाजारात लाँच केली आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक फीचर्सने सुसज्ज असलेली ही बाईक कंपनीने ४ व्हेरियेण्ट मध्ये बाजारात आणली आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.59 लाख रुपये असून वेगवेगळ्या व्हेरिएन्टनुसार गाडीच्या किमतीत सुद्धा बदल पाहायला मिळतोय. आज आपण या बुलेटचे खास फीचर्स, तिचा लूक, डिझाईन याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

लूक आणि डिझाईन –

Royal Enfield Shotgun 650 ची लांबी 2170 mm, रुंदी 820 mm आणि उंची 1105 mm आहे. या बाईकला 140 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला असून सीटची उंची 795 मिमी आहे. या दणकट बुलेटचे वजन 240 किलो असून तुम्ही ती डबल सीट किंवा सिंगल सीट दोन्ही ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. बाईकच्या समोरच तुम्हाला गोलाकार आकारच LED हेडलॅम्प, फ्लॅट हँडलबार दिसेल. Royal Enfield Shotgun 650 मध्ये 13.8-लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक पांढरा, निळा, राखाडी आणि हिरव्या रंगात लाँच केली आहे.

इंजिन – Royal Enfield Shotgun 650

Royal Enfield Shotgun 650 मध्ये कंपनीने 648 cc पॅरलल ट्विन 4 स्ट्रोक SOHC एअर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आले असून 46.3 hp ची पॉवर आणि 52.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. एक लिटर पेट्रोल मध्ये ही बुलेट 22 किलोमीटर पर्यंत मायलेज देईल. Shotgun 650 मध्ये 18 इंच फ्रंट आणि 17 इंच रिअल व्हील्स आहेत. गाडीमध्ये फुल एलईडी लाइटिंग सिस्टीम, ट्रिपर नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स पाहायला मिळतात.

किंमत किती?

Royal Enfield Shotgun 650 च्या बेस मॉडेल शीट मेटल ग्रेची एक्स-शोरूम किंमत 3,59,430 रुपये आहे. तर ग्रीन ड्रिल प्लाझ्मा ब्लू व्हेरिएन्टची किंमत 3,70,138 रुपये, टॉप व्हेरिएन्ट असलेल्या स्टॅन्सिल व्हाईटची किंमत 3,73,000 रुपये आहे