Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield ने केलं Shotgun 650 च्या नवीन व्हर्जनचे अनावरण

Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बाईक लॉन्च करत असते. गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या RE मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने  SHOTGUN 650 ही नवीन बाईक सादर केली होती. हे कंपनीचे लिमिटेड एडिशन मॉडेल होते. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने नवीन प्रोडक्शन रेडी व्हर्जन चे अनावरण केले आहे. हे रेडी व्हर्जन लवकरच अधिकृत पद्धतीने लॉन्च करण्यात येईल. SHOTGUN 650 या मॉडेल चे  मोटोवर्स एडिशन आणि रेगुलर मॉडेल च्या पेंट जॉब मध्ये फरक दिसून येईल. याशिवाय  दोन्ही मॉडेलमध्ये देण्यात आलेले इंजिन हे सेम आहे.

   

2024 मध्ये होईल लॉन्च

Royal Enfield Shotgun 650 अत्यंत पावरफुल लुक, मस्त अशी स्टाईल आणि अप्रतिम फीचर्स ने सुसज्ज असलेली बाईक असून 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या नवीन मॉडेलसह इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल जीटी 650, सुपर मेटीयर 650  लाईन अप मध्ये  सहभागी करण्यात आले आहे. या बाईकची डिझाईन बऱ्यापैकी मेटियॉर 650 ला सेम आहे. 650 CC सेगमेंट मध्ये कंपनीचे हे चौथे मॉडेल आहे.

स्पेसिफिकेशन– Royal Enfield Shotgun 650

Royal Enfield Shotgun 650 या मॉडेलमध्ये 648cc पॅरेलल ट्विन 4 स्ट्रोक SOHC एयर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ला जोडण्यात आले असून 46.3 hp मॅक्झिमम पावर आणि 52.3 nm पिक टॉर्क जनरेट करते. या बाईकची सर्टिफाइड रेंज ही 22 किलोमीटर प्रति लिटर एवढी आहे.

ग्राउंड क्लिअरन्स

Royal Enfield Shotgun 650 हे नवीन मॉडेल बॉबर स्टाईल मध्ये उपलब्ध आहे. या बाईकची लांबी  2170 mm, रुंदी 820 mm, उंची 1105 mm एवढी आहे. कंपनीने या बाईकमध्ये 1465 mm व्हीलबेस आणि 140mm ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. या बाईकच्या सीटची उंची 795 mm एवढी असून वजन 240kg आहे. कंपनीने या बाईकमध्ये 13.8 लिटर फ्युएल टॅंक उपलब्ध केले आहे.

फिचर्स

या बाईक मध्ये सुपर मिटीयॉर प्रमाणेच राऊंड एलईडी हेडलॅम्प, ट्रिपल नेवीगेशन पॉड, फ्लॅट हँडलबार, मिड सेड फूटपेग्स, यूएसडी फ्रंट फोर्क्स, ट्विन शॉक रियर अब्सोर्बर , 18 इंच फ्रंट आणि 19 इंच  रियर व्हील, 320 mm फ्रंट आणि 300mm रियर डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस  यासारखे फीचर्स मिळतात. कंपनीचे हे मॉडेल व्हाईट,प्लाज्मा ब्ल्यू, ग्रीन ड्रिल, शीटमेटल ग्रे यासारख्या चार ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.