Royal Enfield Shotgun 650 गोवा येथील मोटोवर्स इव्हेंट मध्ये सादर; 2024 ला होईल लॉन्च 

टाइम्स मराठी | भारतातील टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी Royal Enfield मार्केटमध्ये वेगवेगळ्या बाईक्स लॉन्च करत असते. आता कंपनी भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करणार आहे. गोवा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या  RE मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने Shotgun 650 ही नवीन बाईक सादर केली. कंपनी ही बाईक 2024 च्या सुरुवातीला लॉन्च करणार आहे. ही बाईक गोवर स्टाईल SG 650 च्या कॉन्सेप्ट वर आधारित असेल.

   

रॉयल एनफिल्डने गोवा येथील मोटोवर्स इव्हेंट मध्ये सादर केलेली Shotgun 650 ही बाईक कस्टम पेंट जॉब सह लिमिटेड वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकची किंमत 4.25 लाख रुपये एवढी ठेवली आहे. एवढेच नाही तर ग्राहक ही बाईक लकी ड्रॉ च्या माध्यमातून देखील खरेदी करू शकतात.

Shotgun 650 या बाईकची डिझाईन बऱ्यापैकी मेटियॉर 650 ला मिळती जुळती आहे.  या बाईकच्या मोटोवर्स मध्ये कंपनीने हाताने पेंड केलेले बॉडी पॅनल दिले आहे. या पॅनलला कस्टम डिझाईन देखील देण्यात आली आहे. Shotgun 650 क्लासिक ही बाईक सिंगल सीट ते ड्यूअल सीट वीकेंड टूरर मध्ये बदलू शकते. कंपनीने SHOTGUN 650 च्या मोटोवर्स या बाईकचे फक्त 25 मॉडेल तयार केले आहे.

या बाईकच्या समोरील बाजूला छोटे फेंडर आणि हेडलॅम्प च्या चारही साईडने प्लास्टिक कव्हर देण्यात आले  आहे. या बाईक मध्ये उपलब्ध असलेल्या टन इंडिकेटर साठी नवीन डिझाईन तयार करण्यात आली आहे. या बाईक मध्ये वेगवेगळ्या डिझाईन सह ब्लॅक फिनिश एक्झॉस्ट, फ्लॅट हँडल बार, बार अँड मिरर  देण्यात आले आहे. याशिवाय बाईक मध्ये लॉंग सीट आणि मिडल सेट फूट पेग्ज मिळतात.

Shotgun 650 या बाईकमध्ये 10 स्पोक अलॉय डिझाईन मिळेल. या बाईकचे इंजिन मेटियॉर 650 च्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आले आहे. या बाईक मध्ये  उलटा फोर्क, लांब हँडल बार, ब्लॅक आउट इंजिन कव्हर मिळेल. रॉयल एनफिल्ड मध्ये देण्यात आलेल्या ॲक्सेसरीज प्रमाणे बार अँड मिरर, LED ब्लॅक इंटिग्रेटर या बाईक मध्ये देण्यात येऊ शकते. या बाईकच्या लिमिटेड व्हेरियंटवर कंपनीकडून वॉरंटी आणि RSA सर्विस सह उपलब्ध करण्यात येणार आहे.