REOWN सोबत सेकंड हॅन्ड बाईक बिझनेस करणार Royal Enfield

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीच्या गाड्या तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने प्री ओन्ड बाईक सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. म्हणजेच आता कंपनी युज्ड बाईक बिझनेस करेल. यासाठी रॉयल एनफिल्ड ने REOWN नावाने नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून कंपनी जुन्या बाईक्स खरेदी, विक्री आणि बाईक आदान प्रदान करणे किंवा नवीन बाईक मध्ये अपग्रेड करण्यामध्ये सक्षम असेल.

   

PTI रिपोर्टनुसार, ग्राहकांचा रॉयल एनफिल्डवर आणखीन विश्वास वाढवण्यासाठी आणि बाईक खरेदी विक्री प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी रॉयल एनफिल्डने ऑफिशियल वेबसाईट देखील लाँच केली आहे. या वेबसाईटवर युजर्स आवडती बाईक्स खरेदी करू शकतात आणि जुनी बाईक सहजरीत्या विकू शकतात. यामुळे रॉयल एनफिल्ड ब्रँडकडून विश्वसनीय बाईक खरेदी करण्याचा चान्स मिळेल. या वेबसाईटवर योग्य किमतीत, अचूक डॉक्युमेंटेशन आणि वॉरंटी सोबत बाईक खरेदी करता येईल.

बाईक खरेदी करण्यासाठी सर्वात पहिले ग्राहकांना ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करावी लागेल. या ठिकाणी यूजर्सला लोकेशन नुसार फेवरेट बाईक सिलेक्ट करण्याचे ऑप्शन मिळेल. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक लोकेशन, व्हेरीएंट, प्राईस रेंज, मॉडेल आणि मॅन्युफॅक्चरिंग इयर हे सर्व ऑप्शन निवडू शकतात. ग्राहकांनी निवडलेल्या लोकेशनवर ज्या बाईक्स उपलब्ध असतील त्या बाईक वेबसाईटवर दिसतील.

या वेबसाईटवर बाईक किती किलोमीटर आतापर्यंत चालवण्यात आली आहे ? यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. याशिवाय ग्राहक बाईकची तुलनाही करू शकतात. एवढेच नाही तर ग्राहकांना टेस्ट राईट देखील बुक करता येऊ शकते. या बाईक्स वर इझी फायनान्स सर्विसेस उपलब्ध करण्यात येईल. जेणेकरून ग्राहकांना हप्त्यावर बाईक खरेदी करता येईल.

रॉयल एनफिल्ड REOWN कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध असलेली बाईकची सर्विस अधिकृत रॉयल एनफिल्ड डीलर यांच्या माध्यमातून करण्यात येईल. एवढेच नाही तर ही बाईक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वीच त्यांची क्वालिटी पूर्णपणे तपासण्यात येईल. जेणेकरून ग्राहकांना अडचणी येणार नाही. सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांच्या मनात असलेला प्रश्न म्हणजे क्वालिटी हा प्रश्न देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून लगबघ सोडवण्यात येईल. एवढेच नाही तर रॉयल एनफिल्ड कडून वॉरंटी आणि दोन फ्री सर्विसेस देखील देण्यात येणार आहे.