आता कॉम्प्युटरचे मदरबोर्ड आणि मेमरी चिप्स ‘ही’ भारतीय कंपनी बनवणार

टाइम्स मराठी । भारत सरकारच्या मेक इन इंडिया (Make In India) या उपक्रमाच्या माध्यमातून भारतामध्ये प्रोडक्ट तयार करून विक्री करणे या उद्देशानेअनेक उत्पादने भारतातच करण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता मेक इन इंडियाच्या माध्यमातून आता भारतीय कंपन्यांनी कंप्यूटरमध्ये (Computer) उपलब्ध असलेले मदरबोर्ड (Motherboard) आणि मेमरीचे चिप्स (Memory Chips) डेव्हलप केल्या आहेत. कंप्यूटर- लॅपटॉप मध्ये काही महत्त्वाचे कंपोनंट्स नसेल तर कम्प्युटर आणि लॅपटॉप सुरू होत नाही. त्यापैकी प्रोसेसर मदरबोर्ड मेमरी आणि डिस्प्ले हे महत्त्वाचे घटक आहेत.

   

कंप्यूटर म्हणजे आज -काल प्रत्येकाला आवश्यक अशी वस्तू बनली आहे. यानुसारच कम्प्युटर मध्ये देण्यात आलेला मदरबोर्ड आणि मेमरी हे महत्त्वाचे पार्ट आहेत. कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर कंप्यूटरचे सर्व कंपोनंट जोडल्या जातात. आणि मेमरी च्या माध्यमातून कंप्यूटर मधील डाटा आणि प्रोग्राम स्टोरेज करून ठेवला जातो. आतापर्यंत कम्प्युटर साठी लागणारे हे कंपोनेंट्स बाहेरील देशांमधून आयात करण्यात येत होते. परंतु भारत सरकारने आता काही प्रॉडक्टच्या आयातींवर बंदी घातल्यानंतर हे प्रोडक्ट आता देशातच बनणार आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतातील काही कंपन्यांनी भारतातच मदरबोर्ड आणि मेमरी चिप आणि मॉडेल्स बनवण्यासाठी काम सुरू केले आहे. यानुसार याच वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असलेल्या सहस्त्र ग्रुप यांचे सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स ही कंपनी स्वदेशी कम्प्युटर मदरबोर्ड भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्याची योजना आखत आहे. या कंपनीने नवीन इंटेल तेराव्या पिढीचा प्रोसेसर यावर अभ्यास करून मदरबोर्ड डिझाईन केला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षण देखील करण्यात आले आहे.

सहस्त्र इलेक्ट्रॉनिक सोल्युशन (Sahastra Electronic Solution) ही पहिली भारतीय कंपनी आहे ज्या कंपनीने भारतामध्ये मदरबोर्ड पूर्णपणे डिझाईन केले आहे. आतापर्यंत मदरबोर्ड चीन किंवा तैवान या ठिकाणी डिझाईन करण्यात येत होते. महत्वाची गोष्ट म्हणजे सहस्रच्या स्वदेशी मदरबोर्डची किंमत सध्या भारतीय कंपन्यांकडून आयात केलेल्या विदेशी ब्रँडच्या तुलनेत 10-15% कमी असेल.

आतापर्यंत कंप्यूटर मध्ये लागणाऱ्या कंपोनंट साठी बाहेरच्या देशातील कंपन्यांवर डिपेंड राहावे लागत होते. आणि भारताचा आयात करण्यामध्ये आकडा प्रचंड वाढला होता. इंटेल, गिगाबाइट, MSI, असुस यासारख्या बऱ्याच विदेशी कंपन्या भारताला मदरबोर्ड पूरवत होत्या. या सर्व कंपन्या बऱ्याच दशकांपासून या व्यवसायात काम करत आहेत. त्याचबरोबर सॅमसंग ह्यनिक्स मायक्रोन यासारख्या बऱ्याच विदेशी कंपन्या मेमरी मॉडेल्स चिप्स विकतात. एवढेच नाही तर या कंपन्यांकडून प्रत्येक वर्षी करोडो लाखो लॅपटॉप डेस्कटॉप आणि सर्वर भारतामध्ये विक्री केल्या जातात. त्यामुळे भारत हा या कंपोनेंट साठी विदेशी देशांवर अवलंबून झाला होता.