दिवाळीला येतोय सलमान आणि कॅटरिना कैफचा टायगर 3; चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च

टाइम्स मराठी । यंदाची दिवाळी सलमान खान आणि कैटरीना कैफचा Tiger 3 सोबत शानदार होणार आहे. टायगर, टायगर जिंदा है यानंतर सलमान खान आणि कैटरीना कैफचा मोस्ट अवेटेड चित्रपट टायगर 3 रिलीज होणार आहे. आज टायगर 3 च्या निर्मात्यांनी याबाबत माहिती देत टायगर 3 चे पहिले पोस्टर लॉन्च केले आहे. एवढेच नाही तर निर्मात्यांनी रिलीज देखील कन्फर्म केली. याबाबत सलमान खानने आणि कॅटरिना कैफ ने देखील ट्विट करून चाहतांना गुड न्यूज दिली.

   

सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

सलमान खानने सोशल मीडिया हँडलवर टायगर 3 चा फर्स्ट लूक पोस्टर जारी केला. या सोबतच रिलीज डेट देखील त्यांनी अनाउन्स केली. यावेळी सलमान खानने ट्वीट करून लिहिले की, आ रहा हु,, दिवाळी 2023 ला येतोय टायगर 3 , यंदाची दिवाळी मोठ्या स्क्रीनवर साजरी करा. हिंदी, तमिळ आणि तेलुगु मध्ये रिलीज. टायगर तीन च्या या पोस्टरमध्ये सलमान खान आणि कैटरीना कैफच्या हातामध्ये बंदूक दिसत असून दोघेही ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे.

कॅटरिना कैफ ने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

कॅटरिना कैफ ने देखील सोशल मीडिया अकाउंट वर टायगर तीन चे पोस्टर शेअर करून कॅप्शन दिले. या कॅप्शन मध्ये असं लिहिलं होतं की, मर्यादा नाही, भीती नाही , मागे वळून बघायचं नाही. या दिवाळीत चित्रपट गृहामध्ये #Tiger3 . टायगर चित्रपटाचे पहिले पोस्टर बघून वाटतंय की, टायगर तीन हा धमाकेदार असणार आहे.

“टायगर जिंदा है” चा सिक्वेल

टायगर 3 हा चित्रपट मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा हे आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल. असं सांगण्यात येत आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत कतरिना कैफ सलमान खान, इमरान हाशमी असणार आहेत. टायगर 3 हा YRF spy Universe मधील पाचवा आणि टायगर जिंदा है चा सिक्वल असेल. सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज झाले असून ४ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.