Samsung खाणार मार्केट!! फोल्डेबल मोबाईलनंतर आता फोल्डेबल लॅपटॉप आणि टॅबलेटही आणणार

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी सॅमसंगने (Samsung) मागच्याच काही दिवसांमध्ये सॅमसंग Galaxy Z Flip 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोल्डेबल स्मार्टफोन असून ग्राहकांना चांगलाच पसंत पडला. त्यामुळे आता या फोल्डेबल मोबाईल ( नंतर सॅमसंग कंपनी लवकरच फोल्डेबल टॅबलेट आणि पोर्टेबल डिस्प्ले वाला लॅपटॉप घेऊन (Samsung Foldable Laptop And Tablet) येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.

   

मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स चे एमएक्स बिजनेस अध्यक्ष आणि प्रमुख टी एम रोह यांनी सांगितलं की, अँड्रॉइड फोल्डिंग टॅबलेट हे एक सर्वात चांगलं प्रॉडक्ट कॅटेगरी असून या ठिकाणी आपण फोल्डेबल वापरू शकतो. 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फोल्डेबल लॅपटॉप आणि टॅब यावर काम सुरू असल्यास त्यांनी सांगितलं. यासाठी कंपनीने सर्वात जास्त इन्वेस्टमेंट केली असून या कंपनीची फंडामेंटल टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानंतर त्याला कंजूमर साठी बाजारात उतरवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या गोष्टी करू शकतात सुरक्षित

सॅमसंग कंपनी लॉन्च करणाऱ्या फोल्डेबल टॅबलेट मध्ये युजर्स त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित करून ठेवू शकतात. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील ही टेक्निक देण्यात आलेली असून लॅपटॉप आणि टॅबलेट मध्ये देखील वापरण्यात येऊ शकते. त्यासाठी बऱ्याच गोष्टींवर काम सुरू आहे.

वापरण्यात येईल ‘हा’ डिस्प्ले

होल्डेबल स्क्रीन असलेले टॅबलेट, स्मार्टफोन आणि लॅपटॉप यामध्ये फ्लेक्झिबल OLED अल्ट्रा थीन ग्लास टेक्नॉलॉजीवाला डिस्प्ले वापरण्यात येणार आहे. यासोबतच LED डिस्प्ले देखील यात असेल. LED डिस्प्ले मुळे इलेक्ट्रिक करंट सप्लाय होतो. आणि डिस्प्ले लाईट मिळतो. या स्क्रीनमध्ये विविध कलर आणि उत्तम कॉन्ट्रास्ट रेशो मिळतो. यासोबतच फ्लेक्झिबल डिस्प्ले टेक्नॉलॉजीसाठी हार्डवेअर सोबतच चांगल्या सॉफ्टवेअर सपोर्टची देखील गरज असते.