Samsung Galaxy A05 : Samsung ने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला दमदार मोबाईल

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळे स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता कंपनीने भारतात बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव  Samsung Galaxy A05 आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला स्मार्टफोन  A05S प्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. सॅमसंगने हा मोबाईल तीन कलर ऑप्शन आणि 2 रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A05 या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच HD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले वर वॉटर ड्रॉप नॉच मिळेल. हा डिस्प्ले 1600 × 720 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करतो. कंपनीकडून मोबाईल मध्ये मीडियाटेक G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 आधारित ONEUI 5.1 core ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो.

कॅमेरा- Samsung Galaxy A05

Samsung Galaxy A05 या स्मार्टफोनमध्ये  f/1.8 अपर्चर असलेला 50 MP प्राइमरी कॅमेरा, 2 MP सेकंडरी कॅमेरा, 8 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल 5000  MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 25 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल बँड वाय-फाय, 4G, GPS, चार्जिंग आणि डेटा सिंक साठी USB Type C पोर्ट, फिंगरप्रिंट सेंसर  मिळते.

किंमत किती

हा मोबाईल कंपनीने 2 स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध केला आहे. यामध्ये 4 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेज आणि 6 GB रॅम 128 GB इंटरनल स्टोरेज या दोन व्हेरियंटचा समावेश आहे. यातील 4 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये आहे तर 6 GB रॅम 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. कंपनीने हा मोबाईल लाईट ग्रीन, ब्लॅक आणि सिल्वर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाईट आणि बाकीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल.