टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे मोबाईल आणि गॅझेट लॉन्च करत असते. ग्राहक सुद्धा मोठ्या विश्वासाने Samsung चे मोबाईल विकत घेतात. आताही कंपनीने आपला Samsung Galaxy A05s भारतात लाँच केला आहे. मागील महिन्यात हा स्मार्टफोन कंपनीने मलेशियामध्ये लॉन्च केला होता, आता भारतात या मोबाईलचे लौंचिंग करण्यात आले आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy A05s मध्ये 6.7 इंचचा फुल HD आणि LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेटसह येतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. स्टोरेजबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये 6/4 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ड स्टोरेज उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाईल मध्ये 5000 mah बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते .
कॅमेरा– Samsung Galaxy A05s
Samsung Galaxy A05s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल सेकंड डेप्थ कॅमेरा, 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. हा स्मार्टफोन OneUI Core आणि android 13 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. तुम्ही हा मोबाईल लाईट ग्रीन, ब्लॅक, लाईट वॉयलेट या कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.
किंमत किती?
Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये एवढी आहे. तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफर देखील कंपनीने या मोबाईल वर उपलब्ध केली आहे. त्यानुसार जर तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करणार असाल किंवा EMI ट्रांजेक्शन करत असाल तर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे.