Samsung Galaxy A05S नव्या स्टोरेजमध्ये लाँच; किंमतही अगदी कमी

टाइम्स मराठी । काही महिन्यांपूर्वी भारतात Samsung कंपनीने एफोर्डेबल Samsung Galaxy A05S हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने परवडणाऱ्या किमतीत गॅलेक्सी A05S स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. आता मार्केटमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे. दिवाळीपूर्वी हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा ऑप्शन अप्रतिम असेल. सॅमसंग कंपनीने हा स्मार्टफोन ३ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

किंमत

Samsung Galaxy A05S या मोबाईल मध्ये 6 GB रॅम  आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट उपलब्ध होता. एवढेच नाही तर 6 GB एक्सटेंडेड रॅम ऑप्शन देखील या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे. आणि 1 TB पर्यंत स्टोरेज देखील वाढवता येते. या 6 GB रॅम असलेल्या स्टोरेज ची किंमत 14,999 रुपये एवढी आहे. कंपनीने आता लॉन्च केलेला नवीन स्टोरेज व्हेरिएंट 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल 12,499 रुपयात लॉन्च केला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन लाईट ग्रीन, लाईट वॉयलेट, ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात.

ऑफर- Samsung Galaxy A05S

Samsung Galaxy A05S या नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनवर कंपनीने स्पेशल ऑफर देखील उपलब्ध केली आहे. यामध्ये कंपनीने फायनान्स, बँक, आणि EMI ऑफर ग्राहकांसाठी दिली आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 1150 रुपये महिना यानुसार EMI वर खरेदी करू शकता.  एवढेच नाही तर कंपनी SBI क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करत आहे.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A05S या स्मार्टफोनमध्ये पंच होल डिझाईन सह 6.7 इंच चा फुल HD आणि LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. या मोबाईल मध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये 5000 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy A05S या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.  त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 MP,  सेकंड डेप्थ कॅमेरा 2 MP, 2 MP मायक्रो कॅमेरा, 13 MP फ्रंट कॅमेरा तुम्हाला मिळेल. हा स्मार्टफोन OneUI Core आणि android 13 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.