18 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होणार Samsung Galaxy A05s

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतामध्ये वेगवेगळे स्मार्टफोन आणि गॅझेट लॉन्च करत असते. या कंपनीचे प्रॉडक्ट ग्राहकांना प्रचंड आवडत असतात.  त्यानुसार सॅमसंग कंपनी वेगवेगळ्या सिरीजमध्ये स्मार्टफोन लॉन्च करत आहे. आता लवकरच सॅमसंग कंपनी ए सिरीज मध्ये नवीन मोबाईल लॉन्च करणार आहे. नुकतंच या मोबाईलची लॉन्चिंग डेट उघड झाली असून 18 ऑक्टोबर पासून हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन मलेशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आता फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून भारतामध्ये देखील उपलब्ध होईल.

   

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A05s मध्ये पंच होल डिझाईनमध्ये 6.7 इंच चा फुल HD आणि LCD डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 90 HZ रिफ्रेश रेट प्रदान करेल. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट प्रदान करण्यात येऊ शकतो. हा चिपसेट 12 GB पर्यंत रॅम एक्सटेंड करेल. त्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करण्यात येईल.

कॅमेरा

Samsung Galaxy A05s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करण्यात आला आहे.  त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल एवढा असेल.  त्यानंतर सेकंड डेप्थ कॅमेरा 2 मेगापिक्सेल, दोन मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या मोबाईलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनी या मोबाईल मध्ये 5000 mah बॅटरी देण्याची शक्यता असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल .

किंमत

Samsung Galaxy A05s या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कंपनीकडून अजून खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु  फेस्टिवल सिझन मध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सॅमसंग गॅलेक्सी चा हा स्मार्टफोन अप्रतिम चॉईस असेल. हा स्मार्टफोन  सॅमसंगच्या सिग्नेचर गॅलेक्सी डिझाईन ग्राहकांपर्यंत पोहोचवेल. असं सॅमसंग कंपनीने सांगितले आहे.