Samsung Galaxy A25 5G : 8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Samsung ने लाँच केला नवा 5G Mobile

Samsung Galaxy A25 5G : भारतात मोबाईलचे दिवाने भरपूर आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल वापरणारे अनेकजण असल्याने मोबाईलची मागणीही देशात मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेलं स्मार्टफोन बाजारात आणत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने आपला Galaxy A25 5G हा मोबाईल भारतात लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये तब्बल 8GB रॅम सह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. आज आपण या मोबाईल बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

   

6.5 इंचाचा डिस्प्ले-

Samsung Galaxy A25 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले जास्तीत जास्त 1 हजार निट्स ब्राइटनेस देतो. तसेच यामध्ये ड्यूड्रॉप नॉच सुद्धा देण्यात आलाय. कंपनीने यामध्ये Exynos 1280 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 OS वर चालतो.

कॅमेरा – Samsung Galaxy A25 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी दिली असून ही बॅटरी 25 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

अन्य फीचर्स –

Samsung Galaxy A25 5G च्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, या मोबाईल मध्ये ड्युअल सिम, ड्युअल बँड वाय-फाय, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, SD कार्डसाठी स्लॉट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर यांसारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Samsung Galaxy A25 5G हा स्मार्टफोन 2 स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे, यातील 8GB + 128GB व्हेरिएन्टची किंमत 26,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंट ची किंमत 29,999 रुपये आहे. तुम्ही हा मोबाईल निळ्या, काळ्या आणि पिवळ्या रंगात खरेदी करू शकता.