Samsung चा मोबाईल झाला स्वस्त; खरेदीची संधी सोडू नका

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने आपल्या Galaxy A34 5G या स्मार्टफोनवर बम्पर डिस्काउंट जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहक कमी पैशात हा मोबाईल खरेदी करू शकतात. दमदार फीचर्स, आकर्षक असा कॅमेरा आणि प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा मोबाईल कंपनीने 30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला होता. परंतु आता कंपनीकडून या स्मार्टफोनच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही अगदी स्वस्तात हा मोबाईल खरेदी करू शकता.

   

किती रुपयांची सूट –

खरं तर Samsung Galaxy A34 5G स्मार्टफोन कंपनीने 30,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी Samsung ने मोबाईलची किंमत इतकी ठेवली होती, मात्र काही दिवसांपूर्वीच कंपनीने हि किंमत कमी करत हा स्मार्टफोन 27,499 रुपयांमध्ये उपलब्ध होता. आता यावर ग्राहकांना आणखी3000 रुपयांची सूट मिळणार असून या डिस्काउंटनंतर या मोबाईलची किंमत 24,499 रुपये होईल.

काय आहेत मोबाईलचे फीचर्स

Samsung Galaxy A34 5G मध्ये .6-इंचाच्या फुल HD+ अमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 25W चार्जिंगला सपोर्ट करते.