Samsung Galaxy A54 5G : 45,999 चा Samsung मोबाईल फक्त 15000 रुपयांत करा खरेदी; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सिझन सुरू असून प्रसिद्ध कंपनी Samsung ने आपल्या फैब ग्रैब फेस्ट सेलच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्तात मस्त असे मोबाईल उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने आपल्या A सिरीजच्या मोबाईल किमती कमी केल्या असून ग्राहकांसाठी ही खरेदीची सर्वात मोठी संधी आहे. यातील Samsung Galaxy A54 5G मोबाईल वर कंपनीने तब्बल दिलेल्या ऑफर नुसार 45,999 रुपयांचा हा मोबाईल तुम्ही अवघ्या 15,000 रुपयांत खरेदी करू शकता. हि ऑफर नेमकी आहे तरी हेच आज आपण जाणून घेऊयात.

   

काय आहे ऑफर

Samsung Galaxy A54 5G या स्मार्टफोनच्या 8GB RAM आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएन्टची किंमत 45,999 रुपये आहे. परंतु सॅमसंगच्या वेबसाईटवर सुरू असलेल्या फेस्टिवल सेलच्या माध्यमातून तुम्हाला या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहे.  त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन 37,499 मध्ये खरेदी करू शकतात. तसेच जर तुम्ही हा मोबाईल ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट करून खरेदी करणार असाल, आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 22,500 पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.  या एक्सचेंज ऑफर साठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या कंडिशनमध्ये पाहिजे. या एकूण सर्व ऑफर पाहता तुम्ही अवघ्या 15000 रुपयांमध्ये हा मोबाईल खरेदी करू शकता.

Samsung Galaxy A54 5G मध्ये काय आहे खास?

Samsung Galaxy A54 5G यामध्ये 6.6 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेटसह येतो. या मोबाईल सोबत डिस्प्ले च्या वर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये samsung Exynos 1380 चीप सेट देण्यात आला आहे. कंपनीने Samsung Galaxy A54 5G मध्ये 5000 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते

कॅमेरा

Samsung Galaxy A54 5G मध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर , यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चरसह प्रायमरी कॅमेरा 50 मेगा पिक्सेल , f/2.2 सेकंडरी कॅमेरा 12 MP, f/2.4  अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा 5 MP आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Samsung Galaxy A54 5G मध्ये देण्यात आलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, 5G सपोर्ट, स्टिरिओ स्पीकर, USB टाईप सी पोर्ट, wifi, ब्लूटूथ यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहे.