Samsung चा धमाका!! 50MP कॅमेरासह लाँच केले 2 नवे मोबाईल

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Samsung ने भारतीय बाजारपेठेत २ नवे मोबाईल लाँच केले आहेत. Samsung Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G अशी या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50-मेगापिक्सेलसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आज आपण Samsung च्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन, कॅमेरा क्वालिटी आणि स्टोरेज याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

6.6-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy A55 5G आणि Galaxy A35 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 nits पीक ब्राइटनेससह येतो. हे दोन्ही मोबाईल ऑक्टा कोअर प्रोसेसरवर काम करत असून Android 14 वर आधारित One UI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतात. Samsung च्या या दोन्ही मॉडेल्समध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 25W ला चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा –

दोन्ही मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Galaxy A55 5G मध्ये 50MPमुख्य कॅमेरा + 12MP अल्ट्रा वाईड अँगल + 2MP मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP फ्रंट कॅमेरा आहे तर दुसरीकडे Galaxy A35 5G मध्ये 50MPमुख्य कॅमेरा + 8MP अल्ट्रा वाईड अँगल आणि 5MP मायक्रो कॅमेरा मिळतोय. तर समोरील बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा आहे

मोबाईलच्या रॅम आणि स्टोरेज बद्दल सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy A55 मोबाईल 8GB आणि 12GB RAM ऑप्शन मध्ये येतो तर Galaxy A35 6GB आणि 8GB रॅम पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोबाईलच्या किमती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही, परंतु उद्या १४ मार्चला मोबाईलची किंमत जाहीर करण्यात येईल.