Samsung Galaxy Book 4 सिरीज कधी लाँच होणार? समोर आली महत्वाची अपडेट

टाइम्स मराठी । Samsung कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च करत असते. आता लवकरच Samsung Galaxy Book 4 सिरीज लॉन्च करण्यात येणार आहे. या सिरीज मध्ये  Samsung Galaxy Book 4  360, Samsung Galaxy Book 4  360 pro, Samsung Galaxy Book 4 Pro, Samsung Galaxy Book 4 ultra हे प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यापूर्वी सॅमसंग कंपनीने  Samsung Galaxy Book 3 सिरीज  फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केली होती. ही सिरीज यशस्वी झाल्याच्या निमित्ताने कंपनी नवीन सिरीज लॉन्च करत आहे. या अपकमिंग सिरीजच्या लॉन्चिंग डेट बद्दल आता खुलासा करण्यात आला आहे.

   

किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, अपकमिंग  Samsung Galaxy Book 4  सिरीज उद्या 15 डिसेंबरला लॉन्च केली जाऊ शकते. या अपकमिंग लॅपटॉप सिरीजची काही दिवसांपूर्वी डिझाईन लिक झाली होती. त्यानुसार काही प्रमाणात माहिती लॉन्चिंग पूर्वी मिळाली आहे. या Samsung Galaxy Book 4 सिरीजच्या बेस मॉडेलची किंमत आणि प्रो मॉडेलची किंमत नेमकी किती असेल याचा अंदाज मात्र बांधता येत नाही.

Samsung Galaxy Book 4 स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy Book 4 सिरीजच्या बेस मॉडेल मध्ये  15.6 इंच FHD डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच या लॅपटॉप सिरीज मध्ये  Intel Core Ultra 5 चीपसेट ने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. यासोबतच Samsung Galaxy Book 4  360 या मॉडेल सोबत कंपनी S पेन देखील मिळू शकतो. यासोबतच 8 GB पर्यंत रॅम यामध्ये मिळू शकते. 

Samsung Galaxy Book 4 PRO model स्पेसिफिकेशन  

Samsung Galaxy Book 4  pro मॉडेलमध्ये 14 इंच डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 2880 ×1800 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करण्याची शक्यता आहे. या मॉडेल सोबत 360 डिग्री हिंज आणि S पेन देखील मिळू शकतो. या सिरीज मध्ये दोन्ही प्रो मॉडेलमध्ये  Intel Core Ultra 7 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

चिपसेट

Samsung Galaxy Book 4 या सिरीज मध्ये Intel Core Ultra चिप्स मिळू शकते. या चिपसेटमध्ये  न्यूरल प्रोसेसिंग युनिट्स  NPU असू शकते. यासोबतच ऑफलाइन  AI फंक्शन ला सपोर्ट देखील हे चिपसेट करेल. एवढेच नाही तर या सिरीज सोबत ही चिपसेट देण्यात आली तर सॅमसंग कंपनीचे नाव ही चिपसेट वापरणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ऍड होण्याची शक्यता आहे. या चिपसेटच्या मदतीने युजर्स ला फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.