15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय हा मोबाईल; काय आहे ऑफर

टाइम्स मराठी । सध्या दिवाळी सुरु असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण सुरु आहे. दिवाळी निमित्त सोने आणि काही वस्तू खरेदी करणे  शुभ मानले जाते. यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर दिले जातात. जेणेकरून ग्राहकांना डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट खरेदी करता येईल. यामुळे ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचाही फायदा होतो. त्यानुसार तुम्ही यंदाच्या दिवाळीला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट 15,000 रुपयांपर्यंत असेल तर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट असा मोबाईल बद्दल सांगणार आहोत. सध्या दिवाळी निमित्त फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर बिग दिवाली सेल सुरू आहे. या सेलमध्ये सॅमसंग कंपनीचा ब्रँडेड स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे.

   

फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग दिवाली सेलमध्ये  ग्राहकांना सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. सॅमसंग कंपनीने  SAMSUNG GALAXY F34 5G हा स्मार्टफोन 20,000 रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये 32 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. यासोबतच बँक ऑफर एक्सचेंज ऑफर देखील या  फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल मध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही कमी किमतीमध्ये सॅमसंगचा हा 5G मोबाईल घरी घेऊन येऊ शकता.

SAMSUNG GALAXY F34 5G या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम व्हेरियंटवर सेलमध्ये 32 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. या डिस्काउंट नुसार तुम्ही हा स्मार्टफोन 16,499 मध्ये खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर 1499 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील यावर मिळत आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन SBI कार्ड च्या माध्यमातून खरेदी करणार असाल  तर ग्राहकांना 1500 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच  तुम्ही हा मोबाईल 14,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकतात.  याशिवाय एक्सचेंज ऑफर देखील या दिवाळी सेलमध्ये उपलब्ध आहे. या एक्सचेंज ऑफर नुसार तुम्हाला 16,499 रुपयांचा अधिकतम एक्सचेंज डिस्काउंटचा फायदा  होईल. एक्सचेंज डिस्काउंट ऑफर स्मार्टफोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे.

SAMSUNG GALAXY F34 5G या स्मार्टफोनमध्ये 50MP OIS प्रायमरी कॅमेरा मिळतो. यासोबतच सेकंडरी कॅमेरा 8 MP,  2 MP मायक्रो  लेन्स देण्यात आली आहे. एवढेच नाही तर मोबाईलच्या समोरील बाजूला सेल्फी साठी 13 MP कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आलेले असून यामध्ये 6000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी 25 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

SAMSUNG GALAXY F34 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच चा FHD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2340 × 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120  hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या डिस्प्लेला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर बेस्ड OneUI 5.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टरी ग्रीन या दोन कलर व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहेत.