Samsung Galaxy F34 फक्त 749 रुपयांत; कुठे आहे भन्नाट ऑफर?

टाइम्स मराठी । नुकताच सॅमसंग कंपनीने Samsung Galexy F34 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स, बेस्ट कॅमेरा कॉलिटी देण्यात आलेली असून भारतीय बाजारामध्ये कंपनीने हा स्मार्टफोन कमी किमतीत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनवर सध्या फ्लिपकार्ट वर शानदार ऑफर चालू असून तुम्ही हाच स्मार्टफोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. त्यापूर्वी जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि यावर देण्यात येणारी ऑफर.

   

फीचर्स –

Samsung Galexy F34 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच चा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आलेला असून हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टरी ग्रीन या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 50MP Ois प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा देण्यात आलेला आहे. याशिवाय समोरील बाजूला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. कंपनीने Samsung Galexy F34 5G मध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.

Samsung Galexy F34 5G या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. यात 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएन्टचा १ मोबाइल आहे. आणि दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. रॅम व्हेरियंट प्रमाणे या दोन्हींच्या किमती वेगवेगळ्या आहेत. आठ जीबी रॅम व्हेरीएन्टची किंमत 20,999 एवढी असून 6GB रॅम व्हेरीएन्ट ची किंमत 18,999 रुपये एवढी आहे. परंतु या स्मार्टफोनवर सुरू असलेल्या ऑफरनुसार तुम्ही हा मोबाइल फक्त 749 रुपयांमध्ये घरी आणू शकतात.

काय आहे ऑफर –

Samsung Galexy F34 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. परंतु या मोबाईलच्या अखेरीवर अनेक ऑफर्स आहेत. यामध्ये नॉन EMI साठी HDFC आणि ICICI बँक कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. EMI साठी तुम्हाला दर महिन्याला 2334 भरावे लागेल. एवढेच नाही तर Samsung Galexy F34 5G या स्मार्टफोनवर 20,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील कंपनीकडून देण्यात येत आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही हा फोन 749 रुपयांमध्ये घरी आणू शकता.