Samsung Galaxy M05 : अवघ्या 7999 रुपयांत Samsung ने लाँच केला 5G मोबाईल

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात अतिशय स्वस्त किमतीत 5G मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy M05 असं या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त असा मोबाईल विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी हा मोबाईल बेस्ट पर्याय ठरेल. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

   

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy M05 मध्ये 6.7-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले ला 720 x 1600 पिक्सेल रिझोल्युशनचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek चा Helio G85 प्रोसेसर बसवला असून त्यानुसार मोबाईल मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज मिळते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Android 14 वर काम करतो.

कॅमेरा – Samsung Galaxy M05

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Samsung Galaxy M05 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ MP डेप्थ सेन्सर देखील आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक यासारखे फीचर्स मिळतात. स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Samsung Galaxy M05 ची किंमत 7999 रुपये आहे. जस आम्ही तुम्हाला सांगितलं कि हा स्मार्टफोन 4GB + 64GB मॉडेलमध्ये येते आणि मिंट ग्रीन रंगात पर्यायात उपलब्ध आहे. तुम्ही हा स्वस्तात मी,मस्त मोबाईल Amazon, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.