Samsung Galaxy M34 5G नव्या स्टोरेज व्हेरिएन्ट मध्ये लाँच

टाइम्स मराठी । Samsung ने भारतीय बाजारपेठेमध्ये याच वर्षी जुलै महिन्यात Samsung Galaxy M34 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8 GB रॅम 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला होता. आता कंपनीने  या स्मार्टफोन मध्ये नवीन स्टोरेज व्हेरियंट ऍड केला आहे. आता कंपनीने 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट मध्ये हा मोबाईल आणला आहे . या लेटेस्ट लॉन्च करण्यात आलेल्या स्टोरेज व्हेरिएंट सह एक्सीनॉस चिपसेट आणि अप्रतिम बॅटरी देखील उपलब्ध केली आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 अँड्रॉइड वर्जन आणि 5 वर्षांपर्यंत सिक्युरिटी पॅच अपडेट देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

   

किंमत

Samsung Galaxy M34 5G या स्मार्टफोनच्या  8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 24,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून सॅमसंगचा हा नवीन स्टोरेज व्हेरियंट स्मार्टफोन 20,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने बँक डिस्काउंट ऑफर देखील या स्मार्टफोनवर उपलब्ध केले आहे. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy M34 5G मध्ये 6.5 इंच चा FHD + डिस्प्ले उपलब्ध करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हेड्स रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला डिस्प्ले 1000 नीट स्पीड ब्राईटनेस सपोर्ट उपलब्ध करत असून या डिस्प्ले च्या प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये स्पीडसह मल्टीटास्किंग साठी एक्सिनॉस 1280 प्रोसेसर दिला आहे. आणि ग्राफिक्स साठी G68 GPU चा वापर करण्यात आला आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M34 5G च्या पाठीमागील बाजूस 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा सेंसर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 13 मेगापिक्सल कॅमेरा बसवण्यात आला आहे.

बॅटरी

या स्मार्टफोन मध्ये 6,000 mAh बॅटरी उपलब्ध करण्यात आली असून ही बॅटरी 25 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर यामध्ये डॉल्बी ऍटमॉस सह सिंगल स्पीकर, पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर इंटिग्रेट उपलब्ध करण्यात आले आहे.