Samsung Galaxy S23 5G वर मिळतेय बंपर सूट; Amazon च्या सेलमध्ये ग्राहकांना होणार फायदा

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. आपल्या ग्राहकांना स्वस्तात मस्त वस्तू देण्यासाठी Amazon सातत्याने नवनवीन सेल आयोजित करत असते. सध्या सर्वत्र सणासुदीचा काळ असून याच पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale 2023 सुरू होणार आहे. अमेझॉनच्या या सेलमध्ये प्राईम मेंबर्स साठी 24 तासांच्या पहिले अर्ली एक्सेस देण्यात येणार आहे. एवढेच नाहीतर केक स्टार्टर डीलच्या माध्यमातून कस्टमरला 6 ऑक्टोबर पर्यंत 25000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट वर एक्सेस देण्यात येणार आहे.

   

Amazon ने सेल सुरू होण्यापूर्वी काही सिलेक्टेड आयटमवर देण्यात आलेल्या ऑफर्सचा खुलासा केला आहे. ही एक किक स्टार्टर डील असून या सेलमध्ये नुकतेच ललॉन्च झालेल्या प्रोडक्ट आणि स्मार्टफोनवर देखील बंपर सूट देण्यात येणार आहे. त्यानुसार अमेझॉनच्या या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये Samsung Galaxy S23 5G ULTRA आणि Motorola Razr 40 या दोन्ही स्मार्टफोनवर 89% डिस्काउंट देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या सेलमध्ये लॅपटॉप स्मार्टवॉच यासारख्या बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये डिस्काउंट ऑफर सोबतच बँक ऑफर देखील देण्यात आली आहेत. चला तत्पूर्वी जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 चे खास फीचर्स आणि किमतीबद्दल.

किंमत आणि ऑफर

Samsung Galaxy S23 या स्मार्टफोन ची किंमत 95 हजार 999 रुपये एवढी असून अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये 79,999 मध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही SBI च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे. या सोबतच कंपनीने एक्सचेंज ऑफर देखील दिली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा जुना मोबाईल 37 हजार 500 रुपयांपर्यंत एक्सचेंज करून आणखीन कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S23 या स्मार्टफोन मध्ये 6.1 इंच FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2340×1080 पिक्सल रिझोल्युशन सह येत आहे. या मोबाईलमध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर दिला आहे. Samsung Galaxy S23 हा स्मार्टफोन सॅमसंगच्या कस्टम वन यु आय 5.1 स्किन सह अँड्रॉइड 13 वर बेस्ड आहे. यामध्ये 3900 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी वायर आणि वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या मोबाईल मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच फोटोसाठी50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेन्स, 10 मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे.