Samsung Galaxy ने S23 सिरीज मध्ये FE व्हेरिएंट केला लॉन्च, जाणून घ्या किंमत 

टाइम्स मराठी । आज-काल परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याकडे मोठा कल दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याच मोबाईल निर्माता कंपन्या ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवनवीन मोबाईल आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी samsung ने आपला नवा मोबाईल बाजारात आणला आहे. samsung ने Galaxy S23 सिरीज मध्ये FE व्हेरिएंट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिंट कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून या मोबाईलची प्रीमियमनेस वाढवण्यासाठी हा कलर मदत करतो.

   

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S23 FE या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले डायनामिक AMOLED 2X आणि FHD पॅनल सह उपलब्ध करण्यात आला असून सूर्याच्या प्रकाशामध्ये हा स्मार्टफोन ठेवल्यास डिस्प्ले पूर्णपणे क्लीन दिसतो. यास मागून मध्ये उपलब्ध करण्यात आलेला डिस्प्ले 1080×2340 रिझोल्युशन  प्रदान करतो. एवढेच नाही तर हा स्मार्टफोन 120 hz रिफ्रेश रेट सह येतो. कंपनीने पहिल्यांदा या स्मार्टफोनमध्ये ऍडॉप्टीव्ह रिफ्रेश रेट दिला आहे. एवढेच नाही तर हा डिस्प्ले 1450 निट्स पीक ब्राईटनेस देखील देतो.

डिझाईन आणि लूक

Samsung Galaxy S23 FE मध्ये I कन्फर्ट शिल्ड उपलब्ध करण्यात आली आहे. जेणेकरून डिस्प्ले क्लिअर दिसू शकेल. आणि अंधारामध्ये किंवा कमी प्रकाशात हा डिस्प्ले डोळ्यांवर चमकणार नाही. कंपनीने हा मोबाईल मिंट कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या मेंट कलर ऑप्शनमुळे हाच स्मार्टफोन क्लासिक आणि एलिगेंट लुक प्रदान करतो.

किंमत किती?

Samsung Galaxy S23 FE हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या डाव्या साईडने पावर आणि वोल्युम बटन उपलब्ध करण्यात आले आहे. आणि सिंग ट्रे च्या वर आणि खाली टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रील उपलब्ध करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, पंच होल कॅमेरा सेंसर  उपलब्ध करण्यात आले आहे.