Samsung Galaxy S23 Ultra वर बंपर डिस्काउंट; खरेदीची संधी सोडू नका

टाइम्स मराठी । ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. हा सेल 3 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान सुरू होणार असून वर्षातील सर्वात मोठा सेल असणार आहे . त्यासाठी कंपनीने मायक्रोसाईटला लाईव्ह केले आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या बिग बिलियन डेज सेल मध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये बऱ्याच बँक ऑफर आणि डिस्काउंट देण्यात येणार आहे.

   

फ्लिपकार्ट वर सुरू होत असलेल्या या बिग बिलियन डेज सेल मध्ये सॅमसंग, एप्पल आयफोन, रियलमी, पोको या स्मार्टफोनवर काही स्पेशल ऑफर देण्यात येणार आहे. त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी S23 ultra या स्मार्टफोनवर देखील बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे लाखो रुपयांमध्ये असलेला हा मोबाईल तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकणार आहात. तर जाणून घेऊयात नेमकी ऑफर काय आहे याबाबत ..

Samsung Galaxy S23 Ultra या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 49 हजार 999 एवढी आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलच्या माध्यमातून यावर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये देण्यात आलेल्या बँक ऑफर नुसार हा स्मार्टफोन तुम्ही 92000 रुपयांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

काय आहेत Samsung Galaxy S23 Ultra चे फीचर्स ?

Samsung Galaxy S23 Ultra या स्मार्टफोन मध्ये 6.8 इंच QHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश रेटसह येत आहे. तसेच तुम्हाला या मोबाईल मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाईल सॅमसंगच्या कस्टम वन यु आय 5.1 स्किन सह अँड्रॉइड 13 वर बेस्ड आहे. यामध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी वायर आणि वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S23 Ultra या स्मार्टफोनमध्ये असलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यात प्रायमरी कॅमेरा 200 मेगापिक्सल एवढा आहे. या कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही शानदार फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकतात. यासोबतच कंपनीने periscope telephoto लेन्स 10 पिक्सल , टेलीफोटो लेंस 10 मेगापिक्सेल आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स या स्मार्टफोन मध्ये दिला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन फँटम ब्लॅक, ग्रीन, क्रीम, लवेंडर, ग्राफिटी, स्काय ब्ल्यू , लाईम, रेड या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.