Samsung Galaxy S24 Series : Samsung ने लाँच केले 3 जबरदस्त मोबाईल; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Samsung Galaxy S24 Series । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Samsung ने Galaxy Unpacked इव्हेंट 2024 मध्ये आपले ३ नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Samsung Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra या मोबाईलचा समावेश आहे. कंपनीने हे तिन्ही मोबाईल वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरियेण्ट मध्ये आणि अपडेटेड फीचर्ससह लाँच केले आहेत. आज आपण या तिन्ही मोबाईलचे खास फीचर्स आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

Samsung Galaxy S24- Samsung Galaxy S24 Series

Samsung Galaxy S24 मध्ये 120 हर्टज रिफ्रेश रेट सह 6.2 इंचाचा FHD+ डायनामिक एमोलेड 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाईल One UI 6.1 बेस्ड Android 14 OS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाईलच्या पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्राव्हाईड कॅमेरा आणि 10MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूल 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईलला 4,000 एमएएच ची बॅटरी मिळत असून ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी साठी यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Wi-Fi Direct, Bluetooth 5.3 आणि USB Type-C पोर्ट आहे.मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy S24 ची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे. तर त्याच्या टॉप वेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे.

Samsung Galaxy S24+

Samsung Galaxy S24+ मध्ये 120 हर्टज रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा FHD+ QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन One UI 6.1 बेस्ड Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीम वर चालतो. या मोबाईल मधेही पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्राव्हाईड कॅमेरा आणि 10MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूल 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने Samsung Galaxy S24+ मध्ये 4900 Mah बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत (Samsung Galaxy S24 Series) सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy S24+ ची सुरुवातीची किंमत सुमारे 99,999 रुपये आहे.

Samsung Galaxy S24 Ultra-

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये कंपनीने 6.8 इंचाचा QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रीफ्रेश रेट आणि 2,600 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. तसेच या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला आर्मर ग्लासचे संरक्षण आहे. या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. तुम्हाला या मोबाईल मध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 1 TB स्टोरेज उपलब्ध असेल. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये पाठीमागील बाजूला 200 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 50 मेगापिक्सेल चा तिसरा कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला 12-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या मोबाईलला 5000mAh बॅटरी असून ही बॅटरी 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S24 Ultra च्या टॉप वेरिएंटची किंमत म्हणजे 12 GB रॅम सह 1TB स्टोरेज 1,59,999 रुपये आहे