Samsung Galaxy S24 Ultra नवीन व्हेरियन्टमध्ये लाँच; पहा काय खास मिळणार?

टाइम्स मराठी । जगातील लोकप्रिय मोबाईल ब्रँड Samsung ने आपला Galaxy S24 Ultra नवीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. खरं तर यावर्षच्या सुरुवातीलाच हा मोबाईल बाजारात आला आहे. आता हा स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज अशा ७ रंगाच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध असेल. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

काय आहेत फीचर्स – Samsung Galaxy S24 Ultra

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा डायनॅमिक AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला आर्मर सपोर्टसह येतो. मोबाईल मध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवला असून सॅमसंगचा हा मोबाईल Android 14 वर आधारित One UI 6.1 वर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झालयास, Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोप कॅमेरा, 10MP टेलिफोटो कॅमेरा आणि 10MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळतोय. तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 12MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 45W चार्जिंगला सपोर्ट करते .

किंमत किती?

Samsung Galaxy S24 Ultra च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,39,999 रुपये आणि टॉप व्हेरिएंट असलेल्या 12GB RAM + 1TB स्टोरेज 1,59,999 रुपये आहे. ग्राहक हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत स्टोअरमधून खरेदी करू शकतात.