टाइम्स मराठी । Samsung कंपनीने भारतात Galaxy Smart Tag 2 डिव्हाईस लाँच केलं आहे. . या टॅगच्या माध्यमातून आपण मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवू शकतो. हा स्मार्ट टॅग कंपनीने काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या स्मार्ट टॅगची किंमत 2,799 रुपये आहे. तुम्ही देखील हा स्मार्ट टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung च्या ऑनलाईन स्टोअर, Amazon आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह शोरूम वरून खरेदी करू शकतात. आज आपण या Smart Tag चे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.
मोड
Samsung च्या या स्मार्ट टॅग 2 मध्ये लॉस्ट मोडचा वापर करण्यात आला आहे. युजर्स टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट डिटेल्स या लॉस्ट मोडच्या माध्यमातून एंटर करू शकतात. त्याचबरोबर हा स्मार्ट टॅग स्कॅन करून मालकाचे डिटेल्स देखील उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच स्मार्ट टॅग ला जोडलेली एखादी वस्तू हरवली असेल तर एखाद्या व्यक्ती या वस्तूवर देण्यात आलेल्या स्मार्ट टॅगच्या माध्यमातून स्कॅन करून मालकापर्यंत पोहोचवू शकतो.
फीचर
सॅमसंग कंपनीच्या या स्मार्ट टॅग 2 मध्ये Compass View फीचर अपडेट करण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स स्मार्ट टॅग ट्रॅक करू शकतात. यामध्ये UI आणि Map View ऑप्शन देखील उपलब्ध करण्यात आले आहे. हे स्मार्ट टॅग वेब ब्राउझर किंवा NFC फीचर्स असलेल्या स्मार्टफोनमध्ये वापरता येऊ शकते. यासोबतच UWB सपोर्ट किंवा एक्सेस असल्यास स्मार्ट टॅग ट्रॅक करणे सोपे जाते.
बॅटरी
SMART TAG 2 चे वजन 13.75 ग्रॅम एवढे आहे. हे स्मार्ट टॅग 28.8 × 52.44 × 8 mm साईज मध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनीने हे स्मार्ट टॅग 2 IP67 रेटिंग सह अपग्रेड केले आहे, जेणेकरून युजर्स कोणत्याही सिच्युएशन मध्ये ट्रॅक करू शकतील. हे स्मार्ट टॅग 2 पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहेत. याच्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर, पाचशे दिवसांपर्यंत या टॅगची बॅटरी चालते. त्याचबरोबर यूजर्स यातील पावर सेविंग मोडच्या माध्यमातून या टॅगची बॅटरी 40% म्हणजे 700 दिवसांपर्यंत वाढवू शकतात.