Samsung Galaxy Tab Active 5 Tablet लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

टाइम्स मराठी । Consumer Electronics Show (CES) 2024 मध्ये प्रसिद्ध ब्रँड Samsung ने Galaxy Tab Active 5 टॅबलेट लाँच केला आहे. हा टॅबलेट वॉटरप्रूफ असून कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही अशा दणकट पद्धतीने बनवण्यात आला आहे. या टॅबलेट मध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत. परतू कंपनीने अजून तरी या टॅबलेटच्या किमतीचा खुलासा केलेला नाही.

   

8-इंचाचा डिस्प्ले– Samsung Galaxy Tab Active 5 Tablet

Samsung Galaxy Tab Active 5 Tablet मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 8-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले चे पिक्सेल रिझोल्यूशन 1920 x 1200 इतकं आहे. हा टॅबलेट Android 12 वर काम करत असून यामध्ये Exynos 1380 प्रोसेसर दिला आहे. Samsung च्या या टॅबलेटची लांबी 126.8 mm, रुंदी 213.9 mm, जाडी 10.1 mm आणि वजन 433 ग्रॅम आहे. या टॅबलेटला IP68 रेटिंग दिल आहे. म्हणजेच कोणत्याही धुळीपासून किंवा पाण्यापासून टॅबलेटला कसलाही धोका नाही.

कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, Galaxy Tab Active 5 च्या पाठीमागील बाजूला 13-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे तर समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung च्या या टॅबलेटमध्ये कंपनीने 5,050mAh बॅटरी दिली आहे. Samsung Galaxy Tab Active 5 मध्ये 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज पर्याय दिला आहे.

अन्य फिचर्स –

टॅबलेटच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy Tab Active 5 Tablet मध्ये ड्युअल सिम, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 5G, 3.5 मिमी ऑडिओ जॅक,वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.