Samsung Galaxy XCover 7 : Samsung ने लाँच केला मजबूत मोबाईल; कसाही वापरा नो टेन्शन!!

Samsung Galaxy XCover 7 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारपेठेत Samsung Galaxy XCover 7 हा रगड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा अतिशय मजबूत असा मोबाईल असून यामध्ये मिलिट्री ग्रेड (MIL-STD-810H) ड्यूरैबिलिटी देण्यात आली आहे. 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 4,050mAh बॅटरीसह सुसज्ज असलेल्या या मोबाईलमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतात. आज आपण या स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेऊयात….

   

6.6-इंच डिस्प्ले –

Samsung Galaxy XCover 7 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.6-इंचाचा फुल-एचडी TFT डिस्प्ले देण्यात आला आहे . या डिप्सले ला 1,080 x 2,408 पिक्सेल रिझोल्युशन मिळतंय. मोबाईल मध्ये MediaTek डायमेंशन 6100 octa-core 6nm प्रोसेसर देण्यात आला असून हा सॅमसंगचा स्मार्टफोन Android 14 वर चालतो. या स्मार्टफोनला रग्ड फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. मोबाईलला मिलिटरी ग्रेड प्रमाणपत्र मिळाले आहे, याचा अर्थ हा स्मार्टफोन खाली पडला तरी त्याला काहीही होणार नाही.

कॅमेरा – Samsung Galaxy XCover 7

मोबाईलच्या कॅमेऱ्यांबद्दल सांगायचं झाल्यास, झाल्यास, Samsung Galaxy XCover 7 मध्ये पाठीमागील बाजूला f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा आहे. तर समोर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये आणला गेला आहे. जे SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

किंमत किती?

कंपनीने हा मोबाईल स्टँडर्ड एडिशन आणि एंटरप्राइझ एडिशन अशा २ व्हेरियन्टमध्ये आणला आहे. त्यानुसार Samsung Galaxy XCover 7 च्या स्टँडर्ड एडिशनची किंमत रु. 27,208 आहे. त्याच्या एंटरप्राइझ एडिशनची किंमत 27,530 रुपये आहे. यातील स्टँडर्ड एडिशन एक वर्षाच्या वॉरंटीसह येते, तर एंटरप्राइझ एडिशन मोबाईलला दोन वर्षांची वारंटी देण्यात आली आहे.