Samsung चा फोल्डेबल मोबाईल अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । 2024 हे वर्ष सुरू होण्यासाठी काही आठवडे बाकी आहेत. त्यातच आता Flipkart या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर Big Year Sale सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रीमियम मोबाईल फोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यानुसार ग्राहक वर्षाच्या अखेरीस कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यावर्षी सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy Z Flip 3 हा आपला फोल्डेबल मोबाईल लॉन्च केला होता. या मोबाईलची किंमत महाग असल्याने अनेकांची इच्छा असूनही त्यांना तो खरेदी करता येत नव्हता. मात्र आता Big Year Sale मध्ये हा मोबाईल निम्म्या किमतीत खरेदी करता येणार आहे.

   

काय आहे ऑफर

Samsung Galaxy Z Flip 3 या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB स्टोरेज असलेला फोल्डेबल फोन 42,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. कंपनीने हा मोबाईल 84,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. त्यानुसार अर्ध्या किमतीमध्ये आता ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

बँक ऑफर

Samsung Galaxy Z Flip 3 तुम्ही हा स्मार्टफोन बँक ऑफ बड़ौदा च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. यासोबतच PNB क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करून तुम्ही मोबाईल खरेदी करणार असाल तर 1,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येईल. जर तुम्ही सैमसंग एक्सिस बैंक इनफिनिट आणि सैमसंग एक्सिस बैंक सिग्नेचर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर 10 टक्के सूट तुम्हाला मिळू शकते. म्हणजेच तुम्ही बँक ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला हा स्मार्टफोन 40,999 रुपयात खरेदी करता येईल.

नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध

Samsung Galaxy Z Flip 3 हा स्मार्टफोन तुम्ही नो कॉस्ट EMI ऑफरनुसार देखील खरेदी करू शकतात. यासोबतच 12 महिन्यांसाठी 699 spotify प्रीमियम प्लॅन देखील कंपनी उपलब्ध करून देत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला 34,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy Z Flip 3 या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये 6.9-इंच FHD Dynamic, AMOLED 2X  डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. यासोबतच 1.9 इंच Super AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो.  या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर स्नैपड्रैगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 3,300mAh बॅटरी यामध्ये मिळते. ही बॅटरी 15W वायर्ड आणि 10W वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करते. या मोबाईलमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यात 12MP OIS प्रायमरी कॅमेरा, 12MP रियर कॅमेरा, 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये WIFI , ब्लूटूथ, NFC, USB TYPE C पोर्ट हे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.